24 C
Mumbai
Wednesday, November 27, 2024
घरविशेषराष्ट्रवादीच्या मदतीने किल्ले लोहगडावर उरुसाचा डाव

राष्ट्रवादीच्या मदतीने किल्ले लोहगडावर उरुसाचा डाव

Google News Follow

Related

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून धर्मांध मुस्लिमांना रान मोकळे झाले आहे, असा संतप्त प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात उभा राहात आहे. रायगड किल्ल्यावर मशिदीसारखे बांधकाम करण्यात आल्याचा उद्वेगजनक प्रकार नुकताच उघड झाला होता. अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावरही अशीच एक मजार बांधण्यात आल्याबद्दल संताप व्यक्त झाल्यानंतर आता लोहगडावर उरुस भरविण्याचा डाव आखला जात आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीच्या आमदाराच्या आशीर्वादाने हे कृत्य होत आहे.

राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या सहकार्याने या उरुसाचे आयोजन करण्यात आले आहे. १७ जानेवारीला हा उरुस लोहगडावर भरणार आहे. तसे पत्रकच शेळके यांनी काढले आहे. सर्व धर्म समभाव असे या पत्रावर लिहिले असून त्यात हाजी हजरत उमरशहावली बाबा यांच्या नावाने हा उरुस भरविण्यात येणार आहे. त्यावर भाजपा नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी सडकून टीका केली आहे. आमदार भातखळकर म्हणाले की, हे अत्यंत बेशरमपणाचे आणि संतापजनक कृत्य आहे. छत्रपती शिवरायांच्या गडावर उरुस करण्याचा उद्देश आणि गरज काय? मध्यंतरी रायगडावर मशीदसदृश बांधकाम करण्याचा प्रयत्न केला. आणखी एका गडावर असाच प्रयत्न झाला. महाभकास आघाडी आल्यानंतर जात्यांध मुस्लिमांची हिंमत वाढली आहे. आपण काहीही करू शकतो. अशी भावना त्यांच्यात वाढीला लागली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी यांची त्यांना फूस आहे. खोटा आणि चुकीचा इतिहास दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. रायगडावरील बांधकाम जसे तोडून टाकण्यात आले तसेच हा उरुसही कायमचा बंद केला पाहिजे, अशी आमची भाजपाची मागणी आहे.

स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरही असेच एका मशिदीचे बांधकाम करण्यात आले होते. रायगडावरील दगडांना पांढरा रंग लावून त्यावर हिरवी चादर अंथरण्यात आली होती. त्यावेळीही शिवप्रेमींनी तीव्र संताप व्यक्त केला होता. शेवटी हे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले.

हे ही वाचा:

स्वच्छ ऊर्जेद्वारे हवामान बदलाशी लढा देण्या संदर्भात युवा नेत्यांचे विचार मंथन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार २५ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन

सदावर्तेंना हटवून पेंडसेंची नियुक्ती; संप मागे घेण्याचे शरद पवारांचे आवाहन

हिमवादळात अडकलेल्या पर्यटकांचे स्नो बाइकर्सने वाचवले प्राण

 

याआधी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथील कुलाबा किल्ला तसेच सरसगड येथेही अज्ञात व्यक्तीनी अनधिकृत मदार बांधली होती. ती हटविण्याची मागणी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी केली होती. या किल्ल्यावर अचानक नवे प्रार्थनास्थळ बांधण्यात आल्याचे आंग्रे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याकडे लक्ष वेधले होते. आंग्रे यांनी सवाल उपस्थित केला होता की, माघी गणेश जयंतीच्या उत्सवाचे खांब उभारण्यासाठी पुरातत्त्व खात्याने आक्षेप घेतला होता पण हे अनधिकृत बांधकाम उभारले गेले तेव्हा त्यांचे लक्ष का नव्हते. अशा प्रकारे किल्ल्यांवर अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे करण्यात येत आहेत आणि हे चिंताजनक आहे, असे महाराष्ट्रातील शिवप्रेमींची भावना आहे.

विशाळगड, प्रतापगड, दुर्गाडी, मलंगगड या किल्ल्यांवर अनेक अनधिकृत गोष्टींना खतपाणी घातले जात असते. त्याला वेळोवेळी विरोध करण्यात येत असतो आणि यापुढेही होत राहील, अशा शब्दांत शिवप्रेमी संताप व्यक्त करतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
199,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा