टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्राच्या गावी भारतीय डाक सेवेच्या वतीने सोनेरी पत्रपेटी उभी करण्यात आली असून त्या पेटीच्या माध्यमातून नीरजच्या या कामगिरीला सलाम करण्यात आला आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने ऍथलेटिक्समधील पहिले सुवर्ण भारताला जिंकून दिले. याआधी भारताला नेमबाजीत अभिनव बिंद्राने वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून दिले होते. त्यानंतर हे दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक ठरले.
नीरज चोप्राला या कामगिरीबद्दल मेजर ध्यानचंद खेल रत्न पुपस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सोनेरी रंगात रंगविलेल्या या पत्रपेटीवर टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये भारताला भालाफेकीत सुवर्ण जिंकून देणाऱ्या नीरज चोप्राच्या गौरवार्थ असे नमूद केले आहे. डाक विभागाने तयार केलेल्या या पेटीची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
नीरज चोप्राने ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर भालाफेक करत हे सुवर्ण जिंकले होते. या त्याच्या कामगिरीनंतर तो एका क्षणात देशातील सर्वात लोकप्रिय व्यक्ती बनला होता. त्याच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्येही प्रचंड वाढ झाली. जाहिरातदारांच्या रांगाही त्याच्या घराबाहेर लागल्या आणि अनेक जाहिरातीत तो चमकू लागला. त्याचे ब्रँड मूल्यही ५०० पट वाढले. ऑलिम्पिकआधी त्याचे ब्रँड मूल्य २ ते १० लाखांच्या दरम्यान होते ते तर २ ते २० कोटींच्या घरात पोहोचले.
हे ही वाचा:
आजपासून यांना मिळणार बूस्टर डोस
… म्हणून पंतप्रधान मोदींचा फोटो आता लस प्रमाणपत्रावर दिसणार नाही
धर्मराष्ट्र की सेक्युलरिझम: जागतिक वास्तव आणि पुनर्विचाराची गरज
भायखळ्यात लाकडाच्या वखारीला भीषण आग
नीरज सध्या पुन्हा एकदा भालाफेकीची जोरदार तयारी करत असून २०२२च्या जागतिक ऍथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी त्याची तयारी सुरू आहे. त्याशिवाय राष्ट्रकुल व आशियाई क्रीडा स्पर्धेतही तो सहभागी होणार आहे.