हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डीकॅप्रिओचे पर्यावरणावरील प्रेम सर्व जगाला माहिती आहे. आता मात्र, या गुणी अभिनेत्याला एक वेगळाच मान प्राप्त होत आहे.
शास्त्रज्ञांनी लिओनार्डोचे नाव नवीन शोध लागलेल्या झाडाच्या प्रजातीला दिले आहे. केवळ मध्य आफ्रिकेत कॅमेरून जंगलात उगवणाऱ्या या झाडाची वृक्षतोड होण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न लिओनार्डो याने केला होता. आणि त्याच्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी त्या झाडाला ” उवेरिओप्सिस डीकॅप्रिओ ” असे नाव देण्यात आले आहे.
” डीकॅप्रिओ वृक्ष ” याची खोडातून उगवलेली पिवळी फुले आहेत. तसेच ते उष्णकटिबंधीय सदाहरित आहे. या वर्षीचे केव संशोधकांनी अधिकृतपणे नाव दिलेली ही पहिली वनस्पती आहे. लिओनार्डो गेल्या काही काळापासून हवामान बदल आणि जैव-विविधतेचे जतन तसेच त्याबद्दल जागरूकता निर्माण कारण्याबबाबत प्रयत्नशील आहे.
मध्य आफ्रिकेतील सर्वात मोठ्या पर्जन्यवनांपैकी एक असलेल्या इबो जंगलाचा मोठा भाग कापला जाणार होता. त्यामुळे संरक्षक आणि संशोधक हैराण झाले होते. तेव्हा डिकॅप्रिओने जंगल, जंगलातील वसाहत ,वनस्पती आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी मोहीम हाती घेतली. डिकॅप्रिओच्या प्रयत्नांमुळे आंतरराष्ट्रीय तज्ञांना मदत झाली. नंतर, सरकारने ही वृक्षतोड योजना रद्द केली.
हे ही वाचा:
बीएमडब्ल्यूचा रंग माझा वेगवेगळा!
शंखनाद झाला! असा असणार पाच राज्यांचा निवडणूक कार्यक्रम
आम आदमी पक्षाचे मत फुटले! चंदीगड महापालिकेत मुख्य उपमहपौरही भाजपाचाच
कझाकस्तानातील ‘इंधन’ का पेटले?
केवचे डॉ. मार्टिन चीक यांनी बीबीसीला सांगितले की, ” शास्त्रज्ञांनी ऑस्कर विजेत्या अभिनेत्याच्या नावावरून या झाडाचे नाव ठेवले आहे कारण आम्हाला वाटते की इबो फॉरेस्टचे वृक्षतोड थांबविण्यात डिकॅप्रिओचा मोठा वाटा होता. ”
डिकॅप्रिओने या आठवड्यात ट्विटरवर एक पोस्ट केली होती. त्या पोस्टमध्ये, “वर्षांपूर्वी, शास्त्रज्ञांनी हवामान बदलाच्या हानीकारक प्रभावांचा अंदाज वर्तवला होता जो आपण आता अनुभवत आहोत. आपण शास्त्रज्ञांचे म्हणणे ऐकले पाहिजे आणि संकट कमी करण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत,” असे लिहले होते.