बॉलीवूड अभिनेता सोनू सूद याने पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’ हे पद स्वेच्छेने सोडले. शुक्रवार ८ डिसेंबर रोजी त्याने ट्विट करत या निर्णयाची माहिती दिली. तसेच हा निर्णय त्याने आणि निवडणूक आयोगाने एकत्र ठरवून घेतल्याचे म्हटले आहे. पंजाब राज्याच्या निवडणुकांपूर्वी हे मोठे पाऊल उचलण्यात आले आहे.
“सर्व चांगल्या गोष्टींप्रमाणेच हा प्रवासही संपुष्टात आला. मी पंजाबचा ‘स्टेट आयकॉन’ म्हणून स्वेच्छेने पायउतार झालो आहे. पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत माझ्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार असल्याचे लक्षात घेऊन हा निर्णय मी आणि निवडणूक आयोगाने घेतला आहे. भविष्यातील त्यांच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा देतो,” असे सोनू सूद याने ट्विट केले आहे.
Like all good things, this journey has come to an end too.I've voluntarily stepped down as the State Icon of Punjab.This decision was mutually taken by me and EC in light of my family member contesting in Punjab Assembly Elections.
I wish them luck for future endeavours.🇮🇳— sonu sood (@SonuSood) January 7, 2022
त्यानंतर निवडणूक आयोगानेही अभिनेता सोनू सूद याची नियुक्ती मागे घेतल्याचे सांगितले. पंजाबच्या मोगा जिल्ह्यातील सोनू सूद यांची गेल्या वर्षी निवडणूक मंडळाने ‘स्टेट आयकॉन’ म्हणून निवड केली होती. सूद याची बहिण मालविका सूद ही पंजाबची निवडणूक लढवणार असल्याचे नोव्हेंबरमध्ये सांगितले होते. मात्र, कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार याबाबत त्यांनी मौन बाळगले होते.
हे ही वाचा:
झुलन गोस्वामीच्या मुख्य भूमिकेत विराटची बायको!
भारतीयांना लवकरच ई-पासपोर्टची सेवा
आतंकवाद्यांच्या निशाण्यावर रेशीमबाग
‘सत्ताधारी नेते लॉकडाऊनच्या धमक्या देऊन तणाव निर्माण करतायत’
सोनू सूद याने अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली होती. केजरीवाल यांनी गेल्या वर्षी शालेय विद्यार्थ्यांसाठी ‘देश का मेंटर्स’ या कार्यक्रमासाठी सोनू सूदला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून घोषित केले होते. मात्र, अरविंद केजरीवाल यांच्या भेटीमुळे सोनू सूद हा राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.