22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषभारताने गमावली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी

भारताने गमावली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची दुसरी कसोटी

Google News Follow

Related

खराब फलंदाजीचा फटका भारतीय संघाला बसला आणि दक्षिण आफ्रिकेने तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरी कसोटी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जोहान्सबर्ग येथे झालेल्या या कसोटीच्या दुसऱ्या डावात २४० धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेने अवघ्या ३ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले आणि सामना जिंकला. डीन एल्गर (९६) सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

भारतीय फलंदाजांना या कसोटीत सुरुवातीपासूनच सूर गवसला नाही. एकाही फलंदाजाने दोन्ही डावात ६० पेक्षा अधिक धावा केल्या नाहीत. त्यात पहिल्या डावात सलामीवीर के.एल. राहुलची ५० धावांची खेळी सोडली तर कुणाला अर्धशतकही झळकाविता आले नाही. त्यामुळे पहिल्याच डावात आपण २०२ धावाच करू शकलो. त्याला दक्षिण आफ्रिकेने २२९ धावांचे उत्तर देत २७ धावांची आघाडी घेतली. भारतीय गोलंदाजांनी मात्र या कसोटीत चांगली कामगिरी केली. शार्दुल ठाकूरने पहिल्या डावात ७ बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेला २२९ धावसंख्येवर रोखले होते. पण फलंदाजांना त्याचा फायदा उठवता आला नाही.

दुसऱ्या डावात भारताला २६६ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. त्यात चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी अर्धशतके झळकाविली पण बाकी फलंदाजी सुमारच राहिली. पहिल्या डावातील २७ धावांच्या पिछाडीमुळे यजमान दक्षिण आफ्रिकेसमोर २४० धावांचे आव्हान होते. डीन एल्गरने सलामीवीर म्हणून नाबाद ९६ धावांची खेळी करत या विजयात मोलाची कामगिरी बजावली. त्याला ड्युसेन (४०), कीगन पीटरसन (२८) यांची छान साथ लाभली.

हे ही वाचा:

मैत्रिणीची निर्घृण हत्या करणारा मित्र अटकेत

‘ॲपल’चे बाजारमूल्य झाले ३ ट्रिलियन डॉलर!

ISIS मध्ये भर्ती होण्यास प्रवृत्त करणारे दोन दहशतवादी दोषी

ठाकरे सरकारची दडपशाही सुरूच! भाजपाचे जितेन गजारिया यांच्या कार्यालयात सायबर पोलीस

 

स्कोअरबोर्ड : भारत २०२ आणि २६६ पराभूत वि. दक्षिण आफ्रिका २२९ आणि ३ बाद २४३ (डीन एल्गर ९६, रॅसी ड्युसेन ४०, मोहम्मद शमी ५५-१, शार्दुल ठाकूर ४७-१)

भारत १ – दक्षिण आफ्रिका १

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा