मुंबईतील साकीनाका परिसरात २९ वर्षीय तरुणीच्या डोक्यावर आणि मानेवर वार करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनीषा जाधव असे या मुलीचे नाव असून ती गुरुवारी पहाटे च्या सुमारास चांदिवली येथील संघर्षनगर येथील साईबाबा मंदिराजवळ जखमी अवस्थेत आढळून आली. नंतर तिचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मनीषाला घाटकोपर (मुंबई) येथील जवळच्या राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी मनीषाला मृत घोषित केले. मनिषा गेल्या ३ वर्षांपासून तिचा मित्र राजू निळे (४२ ) याच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहत होती.
मनीषा जाधव ही साकीनाका चांदिवली येथील संघर्ष नगर या ठिकाणी मित्र राजू निळे (४२) याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहात होती. राजू हा टीव्ही मेकॅनिकचे काम करायचा तर मनीषा ही घरकाम करायची. मागील काही दिवसापासून हे दोघे एकमेकांवर संशय घेत असल्यामुळे वाद सुरू होता. त्यातच राजू हा त्याच्या पहिल्या पत्नीला भेटण्यासाठी गेल्यामुळे दोघातील वाद वाढला आणि आणि गुरुवारी रात्री दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले.
हे ही वाचा:
पंजाबमध्ये मोदींचा ताफा अडवल्याचे महाराष्ट्रात पडसाद
लहान मुलांच्या ममींचे काय आहे रहस्य?
खोक्यात खेकडे असल्याचा बनाव; प्रत्यक्षात निघाली कासवे
या भांडणात राजू निळे यांनी मनीषा हिच्यावर चाकूने वार केले या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मनीषाला उपचारासाठी राजावाडी येथे आणण्यात आले असता डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी राजू निळे याच्याविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती साकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख यांनी दिली.