बुधवार ५ जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र, निर्बंध अधिक कठोर करण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे. या बैठकीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात येणार असून त्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
मंत्रालयातील बैठकीला आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुख्य सचिव, टास्क फोर्स अधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यात तूर्तास लॉकडाऊन न लावण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, नागरिकांनी गर्दी करू नये म्हणून निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कंटेन्मेट झोन वाढवणे, रुग्णालयांची सज्जता, लसीकरण वेगाने करणे आदींचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. रात्रीपासून राज्यात नवे निर्बंध लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हे ही वाचा:
‘महाराष्ट्र आज एका मातेला, एका ज्येष्ठ समाजसेविकेला मुकला आहे’
‘डॉ. सिंधुताई सपकाळ यांनी केलेल्या समाजसेवेसाठी त्या नेहमी स्मरणात राहतील’
पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्यावर आज पुण्यात होणार अंत्यसंस्कार
अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांचे निधन
कोरोनाची आणि ओमायक्रोनची वाढती रुग्णसंख्या ही चिंतेची बाब असून मुंबई- पुण्यातील पहिली ते नववीच्या शाळा बंद करण्यात आल्या असून ऑनलाईन वर्ग भरवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात मंगळवारी कोरोनाच्या तब्बल १८ हजारांहून अधिक दैनंदिन रुग्णांची भर पडली असून मुंबईतही रुग्णसंख्या वाढत आहे.