पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने आघाडी घेतली असली तरी एका जागेवर राष्ट्रवादीला दणका बसला आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या प्रदीप कंद यांनी सुरेश घुले यांचा पराभव केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेवेळी प्रदीप कंद यांना जागा दाखवून देण्याचे आवाहन केले होते. मात्र, सुरेश घुलेंचा १४ मतांनी पराभव झाला.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारने वर्चस्व मिळवले असले तरी एका जागेवर भाजपचे प्रदीप कंद यांचा विजय झाला आहे. विशेष म्हणजे या जागेविषयी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचार सभेत प्रदीप कंद यांना जागा दाखवून देणार असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यानंतर याच प्रदीप कंद यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुरेश घुले यांचा पराभव केला आहे.
हे ही वाचा:
पालिका आयुक्त म्हणतात मुंबईत ‘इतके’ रुग्ण झाले की लॉकडाऊन
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोरोनाची लागण
७० वर्षीय नोकराची हत्या, मालकाला अटक
मंदिराच्या दारात लटकवले गोमांस
पुणे जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी १४ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. दरम्यान आज मंगळवारी अल्पबचत भवनात मतमोजणीत पार पडली. यामध्ये भाजपचे उमेदवार प्रदीप कंद यांना ४०५ तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश घुले यांना ३९१ मते मिळाली आहेत.