एकीकडे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढताना दिसत असून सरकारी पातळीवरून त्याबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमांमध्येच सर्व कोरोना प्रतिबंधक नियम पायदळी तुडवून गर्दीचा कडेलोट पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्या शिवसेनेने अंधेरीत आयोजित केलेला जत्रोत्सव हा कार्यक्रम त्याचे ताजे उदाहरण आहे. शिवसेनेतर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमात वरून सरकार विरोधात टीकेची झोड उठली आहे. या डबल ढोलकी मुळेच राज्याची जनता कोरोनाचे इशारे गंभीरपणे घेत नाहीत असा घणाघात भाजपा आणि आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात शिवसेनेतर्फे जत्रोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या जत्रोत्सवात निरनिराळे खेळ, खायची दुकाने, मनोरंजनाचे कार्यक्रम, आकाश पाळणे अशा अनेक गोष्टी पहायला मिळत आहेत. या उत्सवाला कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसून लोक गर्दी करताना दिसत आहेत. एकीकडे राज्याची परिस्थिती चिंताजनक होत असून तिसऱ्या लाटेच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध कडक करून गरज पडल्यास लॉकडाऊन लावायचीही चर्चा सरकारमधील मंत्री करताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
‘२०१७ चे वचन पूर्ण करायला २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले’
योगी आदित्यनाथ यांची जाहिरात कविता कृष्णन यांना झोंबली
नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईतून ३ कोटींचे ड्रग्ज जप्त
लॉकडाऊनच्या निर्णयावरून ठाकरे सरकारमध्येच संभ्रम?
पण हे सगळे असताना सत्ताधारी पक्षांकडूनच कोणतीही खबरदारी न घेता जत्रोत्सव सारखे कार्यक्रम आयोजित केले जात असल्यामुळे त्यांच्या विरोधात टीकेची झोड उठली आहे. भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विटरवर या जत्रोवातील व्हिडिओ शेअर करत सरकारवर निशाणा साधला आहे. लोकांना रिकामटेकडे सल्ले देण्या आधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या घराकडे लक्ष द्यावे असे भातखळकर यांनी म्हटले आहे.
शिवसेनेने अंधेरी पश्चिमेला आयोजित केलेल्या जत्रोत्सवातील ही गर्दी पाहा. लोकांना रिकामटेकडे सल्ले देण्याआधी मुख्यमंत्र्यांनी आपल्या घराकडे लक्ष द्यावे. लोक या डबल ढोलकी मुळेच कोरोनाचे इशारे गंभीरपणे घेत नाहीत. pic.twitter.com/kaGweuIAga
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 1, 2022