आगामी मुंबई महापलिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारला जाग आली असून सरकारने मोठा निर्णय घेत मुंबईतील ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांसाठी कर माफी करण्यात आली आहे. या निर्णयाबद्दल बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला दिलेले वचन पूर्ण केल्याचे सांगितले. यावरून भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्र्यांनी आज राजकीय नाट्यमय घोषणा करत ५०० स्क्वेअर फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कराच्या माफीची घोषणा केली, असे अतुल भातखळकर म्हणाले. विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या आमदारांनी या विरुद्ध आवाज उठवल्यावर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटले.
मा.@Dev_Fadnavis यांच्या विधीमंडळ अधिवेशनातील दणक्यानंतर मुंबईतील ५०० चौ.फु. पर्यंतच्या सदनिकांचा मालमत्ता कर माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. भाजपामुळे दोन वर्षानंतर आली विसरनाम्यातील वचनाची आठवण. pic.twitter.com/DWeSHii9Jb
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) January 1, 2022
मुख्यमंत्र्यांनी वचननाम्यात जर हे आश्वासन दिले होते मग त्यासाठी दोन वर्षे का लागली? असा जाब आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. कोरोना काळात मोफत लसी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली होती, त्याचे काय झाले, असा खोचक सवाल अतुल भातखळकर यांनी विचारला आहे. वादळ असेल किंवा अतिवृष्टी असेल त्यानंतर एक रुपयांची मदत तुम्ही मुंबईकरांना केलेली नाही, असा घाणाघात अतुल भातखळकर यांनी केला आहे. भाजपने दिलेल्या दणक्यानंतर तुम्हाला हे सर्व आठवल्याचे भातखळकर म्हणाले.
हे ही वाचा:
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे सरकारला आठवले वचन; ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी
नवीन वर्ष महागाईचे की स्वस्ताईचे? वाचा सविस्तर
लहान मुलांच्या लसीकरण नोंदणीला आजपासून सुरुवात
जगाच्या पाठीवर भारताला नवी ओळख देणारे पंतप्रधान मोदी
शनिवारी नगरविकास खात्याची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीत ५०० स्क्वेअर फूटांपर्यंतच्या घरांना करमाफी करण्यात आली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. मालमत्ता कर माफ करून वचन दिल्याप्रमाणे शब्द पाळला असल्याचे ते यावेळी म्हणाले.