भारतीय मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाची जबाबदारी आता के. एल. राहुलच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. आगामी दक्षिण आफ्रिका विरोधातील एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा राहुलच्या खांद्यावर देण्यात आली आहे. तर जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराह याच्याकडे उपकर्णधार पद देण्यात आले आहे.
शुक्रवार, ३१ डिसेंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने दक्षिण आफ्रिका संघासोबतच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात खेळणारा भारतीय संघ खालीलप्रमाणे असणार आहे.
हे ही वाचा:
नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मोदी सरकारची शेतकऱ्यांना खास भेट
नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी
झोपेचं सोंग घेतलेल्या प्रशासनाला जागं करण्यासाठी ‘कोळी परिषद २०२२’ आयोजित
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
भारतीय संघ
केएल राहुल (कर्णधार,), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, ऋषभ पंत (विकेटकिपर), इशान किशन (विकेटकिपर), यझुवेंद्र चहल, आर.अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज,
राहुलसाठी आणि भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार करून हा निर्णय महत्वाचा मानला जात आहे. भारतीय संघासाठी सलामीला खेळणारा के. एल. राहुल हा सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत राहुल चांगली कामगिरी करत आहे. पंचगिल्या सामन्यात त्याने भारतीय संघाच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली आहे. त्याने या सामन्यात शतक ठोकले असून त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.