नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देशभरातील शेतकऱ्यांना केंद्रातील मोदी सरकार तर्फे खास भेट मिळणार आहे. १ जानेवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी या योजनेचा दहावा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. या योजनेच्या अंतर्गत तब्बल वीस हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. तर देशभरातील तब्बल दहा कोटींपेक्षा अधिक लाभार्थी शेतकरी कुटुंबांना याचा फायदा होणार आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तारूढ झाल्यापासून त्यांनी सुरुवातीपासूनच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न केले त्यासाठी अनेक नवीन योजना सुरू केल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी ही अशीच एक योजना एकाही काय देशभरातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होत आहे. पीएम-किसान या योजने अंतर्गत पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाला, चार महिन्यांच्या अंतराने २००० रुपयांचे तीन हप्ते असे वार्षिक ६००० रुपये देण्यात येतात.लाभार्थींच्या थेट बँक खात्यात ही रक्कम जमा होते. या योजनेत १.६ लाख कोटीपेक्षा जास्त सन्मान रक्कम शेतकरी कुटुंबाना आतापर्यंत हस्तांतरित करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
नोव्हेंबर महिन्यात भारताने केली तिसऱ्या बॅलेस्टिक मिसाईल सबमरीनची यशस्वी चाचणी
कंगना रानौतला न्यायालयाचा धक्का!
समीर वानखेडे यांचा एनसीबी कार्यकाळ संपला; कशी होती त्यांची कारकीर्द?
शनिवार, १ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता ही सन्मान रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाणार आहे. दुरदृष्य प्रणालीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर या कार्यक्रमात सुमारे ३५१ शेतकरी उत्पादन संस्थाना (एफपीओ) १४ कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधान जारी करणार आहेत. देशभरातील १.२४ लाखाहून अधिक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकरी उत्पादन संस्थांशी संवाद साधणार असून राष्ट्राला संबोधित करणार आहेत.