अनुभवी फलंदाज रॉस टेलर न्यूझीलंडच्या घरच्या हंगामाच्या शेवटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल, मार्च २००६ मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध नेपियर येथे एकदिवसीय सामन्यात सुरू झालेल्या करियरचा या सीरिजनांतर शेवट होईल.
आपल्या खेळाच्या भविष्याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम देत, ३७ वर्षीय खेळाडूने गुरुवारी (डिसेंबर ३०) पुष्टी केली की बांगलादेशविरुद्धची आगामी दोन कसोटी सामन्यांची मालिका न्यूझीलंडच्या संघाकडून त्याची शेवटची असेल. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुढील कसोटी खेळणार नाही आणि उन्हाळ्यात ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सविरुद्ध सहा एकदिवसीय सामने खेळणार नाही.
टेलरची शेवटची कसोटी क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल येथे होणार आहे. यानंतर त्याने खेळलेल्या सामन्यांची संख्या ११२ वर जाईल, ज्यामुळे न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूने खेळलेल्या सर्वात जास्त कसोटी सामन्यांमध्ये तो डॅनियल व्हिटोरीशी बरोबरी साधेल.
टेलरने एका निवेदनात म्हटले आहे की, “हा एक आश्चर्यकारक प्रवास आहे आणि मी माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले म्हणून मी भाग्यवान समजतो.” “खेळातील काही महान खेळाडूंसोबत खेळणे आणि त्यांच्या विरोधात खेळणे आणि या वाटेवर अनेक आठवणी आणि मैत्री निर्माण करणे हा एक विशेष अनुभव होता.
हे ही वाचा:
बुटांनी काढला दहिसर बँक दरोडेखोरांचा माग
‘आम्ही २० करोड मुसलमान…’ नसिरुद्दीन शहांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड
‘हे’ असेल झाशी स्थानकाचे नवे नाव
“परंतु सर्व चांगल्या गोष्टी संपल्या पाहिजेत आणि ही वेळ माझ्यासाठी योग्य वाटत आहे. मला माझे कुटुंब, मित्र आणि ज्यांनी मला या टप्प्यावर येण्यास मदत केली त्या सर्वांचे आभार मानायचे आहेत.
टेलर, जो तीन फॉरमॅटमधील प्रत्येकी १०० गेममध्ये खेळणारा पहिला आंतरराष्ट्रीय खेळाडू बनला, त्याने न्यूझीलंडच्या संघातून अनेक विक्रम केले. त्याच्या एकूण धावा (१८,०७४), सामने (४४५) आणि शतके (४०) कोणत्याही न्यूझीलंड क्रिकेटपटूसाठी सर्वाधिक आहेत.