चित्रपटांमधून स्वतःला स्टुपिड कॉमन मॅन म्हणवून घेणाऱ्या नसिरुद्दीन शहा यांच्यातील मुसलमान खऱ्या आयुष्यात बाहेर आला आहे. आम्ही २० करोड मुसलमान असे सहजासहजी नष्ट होणार नाही असे नसिरुद्दीन शहा यांनी म्हटले आहे. रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेच्या बाबत प्रतिक्रिया देताना नसिरुद्दीन शहा यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
नसिरुद्दीन शहा यांची नुकतीच पत्रकार करण थापर यांच्यासोबत एक मुलाखत पार पडली. या मुलाखतीचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे. नसिरुद्दीन शहा यांची ही मुलाखत चांगलीच वादग्रस्त ठरली आहे. यावेळी नसिरुद्दीन शहा यांनी गृहयुद्धाची भीती व्यक्त केली आहे. रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेच्या बाबत भाष्य करताना “या लोकांना माहित नाही की ते कशाबद्दल बोलत आहेत. कशाचे आव्हान करत आहेत. हे एक प्रकारे गृहयुद्धासारखे होईल” असे नसरुद्दीन शहा म्हणाले.
हे ही वाचा:
‘मुघल हे तर राष्ट्र निर्माते!’ नासिरुद्दीन शहांचा जावई शोध
‘राष्ट्रवादी काँग्रेस सोबत सरकार स्थापण्याची मोदींची इच्छा होती!’ पवारांची नवीन पुडी
निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी पुन्हा परदेशात पळाले
नारायण राणेंना सिंधुदुर्ग पोलिसांनी बजावलेली नोटीसच बेकायदेशीर
“आम्ही मुसलमान २० करोड आहोत. आम्ही लढू ही जागा आमच्यासाठी मातृभूमी आहे. आम्ही २० करोड लोक इथलेच आहोत. आमचा जन्म येथे झाला आहे. आमचा परिवार आणि कित्येक पिढ्या इथे जन्मले आणि याच मातीत मिळाले आहेत. जर कोणी आमच्या विरोधात अभियान सुरू करत असेल तर त्याचा तीव्र विरोध होईल आणि याने खूप मोठे नुकसान होऊ शकते.” असा इशारा नसरुद्दीन शहा यांनी दिला आहे
मुसलमानांना दुय्यम दर्जाचे नागरिक ठरवले जात आहे. असे करून मुसलमानांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करण्यात येत आहे. पण मुसलमान हार मानणार नाहीत आम्ही या स्थितीचा सामना करू. आम्हाला आमचे घर आणि मातृभूमीची रक्षा करायची आहे असे नसिरुद्दीन शहा म्हणाले.