26 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणनारायण राणेंच्या घरावर कणकवली पोलिसांची नोटीस

नारायण राणेंच्या घरावर कणकवली पोलिसांची नोटीस

Google News Follow

Related

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना कणकवली पोलिसांनी नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार नारायण राणे यांना दुपारी ३ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, ही नोटीस नारायण राणे यांच्यापर्यंत पोहचली नसल्यामुळे आणि नारायण राणे हे घरी नसल्यामुळे कणकवली पोलिसांनी त्यांच्या घरावर नोटीस लावली आहे. नितेश राणे सध्या कुठे आहेत याबद्दल माहिती घेण्यासाठी नारायण राणे यांना बोलावण्यात आल्याचे वृत्त आहे.

मंगळवारी २८ डिसेंबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना नारायण राणे यांना नितेश राणे कुठे आहेत असा प्रश्न विचारताच त्यांनी ‘नितेशचा पत्ता सांगालयला मला मूर्ख समजता का,’ असा प्रतिप्रश्न त्यांनी पत्रकारांना केला होता. या वक्तव्यावरून राणेंना नितेश राणे कुठे आहेत, याची माहिती असणार, असा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या प्रकरणात आता नारायण राणे यांना नोटीस देण्यात आली आहे.

नोटीसमध्ये ३ वाजता पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले असताना राणे उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर ही नोटीस राणे यांच्यापर्यंत पोहचली नसल्याने पोलीस नारायण राणे यांच्या घरी नोटीस घेऊन पोहचले. मात्र, नारायण राणे हे घरी नसल्यामुळे त्यांच्या घराबाहेर ही नोटीस लावण्यात आली आहे. यानंतर नारायण राणे हजर राहणार की नाही, याकडे सर्वांची नजर आहे.

हे ही वाचा:

१२ आमदारांच्या नियुक्तीवरून ठिणगी पडली असेल!

बांद्रा रेक्लेमेशनला कोरोना रुग्ण ‘वाढविण्याची’ सोय?

मालेगाव बॉम्बस्फोट: योगींचे नाव घेण्यास परमबीर सिंग यांनी सांगितले

पुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल

१८ डिसेंबरला संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली. संतोष परब याच्यावरील हल्ल्याचे सूत्रधार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप शिवसेनेने केला. संतोष परब हल्ला प्रकरणात सत्ताधारी आघाडी नितेश राणेंना गोवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा