विधानसभा अध्यक्ष निवडणुकीवरून मंगळवारी २८ डिसेंबर रोजी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये पत्रव्यवहार झाला होता. मात्र, या पत्रावरून आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात यावा यासंदर्भात हे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लिहिले होते.
मुख्यमंत्र्यांनी विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबद्दल राज्यपालांना पत्र लिहिले होते. मात्र, या पत्रात जी भाषा वापरली आहे त्यावरून राज्यपालांनी नाराजी व्यक्त करणारे पत्र लिहिले आहे. हे पत्र वाचून मी दुःखी आणि निराश झालो आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटले आहे. पत्रातील भाषा ही अत्यंत असंयमी आणि धमकीवजा असल्याचे राज्यपालांनी म्हटले आहे. पत्रातून निर्णयासाठी दबाव आणण्यात आला असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. निर्णय घेताना सर्व बाबींचा विचार करायला हवा, असे राज्यपाल कोश्यारी म्हणाले.
हे ही वाचा:
भारतातील विमानतळांवर वाजणार ‘आपले’ संगीत
पुण्याची डॉक्टर ठरली ‘पॉवर’फुल
डॉलरच्या बदल्यात चक्क रिन साबणाच्या वड्या
महाराष्ट्र, कर्नाटक, कोल्हापूर, रेल्वे बाद फेरीत धडकले
विधानसभा अध्यक्ष निवडणुकीबद्दल मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. विधानसभा अध्यक्षपदावरून राज्य सरकार विरुद्ध राज्यपाल भगसिंग कोश्यारी हा संघर्ष सुरू होता आणि आता हा संघर्ष पाहायला मिळेल. पाच दिवसांच्या अधिवेशनात पूर्णवेळ अध्यक्षासाठी प्रक्रिया पार पडणार होती. हे मतदान आवाजी पद्धतीने व्हावे, असा सत्ताधाऱ्यांचा आग्रह होता. मात्र, त्याला विरोधकांनी विरोध दर्शवला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. त्यावरून राज्यपालांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.