27 C
Mumbai
Saturday, January 11, 2025
घरक्राईमनामा२ किलो आरडीएक्सने घडविला होता लुधियाना न्यायालयात स्फोट

२ किलो आरडीएक्सने घडविला होता लुधियाना न्यायालयात स्फोट

Google News Follow

Related

लुधियाना येथील न्यायालयात झालेल्या स्फोटात २ किलो आरडीएक्स (रॉयल डिमॉलिशन एक्स्प्लोझिव्ह) वापरण्यात आल्याचे न्यायवैद्यक विभागाने केलेल्या तपासणी अहवालात नमूद करण्यात आले आहे. २३ डिसेंबरला लुधियाना न्यायालयात हा स्फोट झाला होता.

या स्फोटादरम्यान पाइप फुटल्यामुळे त्यातील पाण्यासोबत या स्फोटकातील बहुसंख्य भाग वाहून गेला, असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

२३ डिसेंबरला लुधियानातील जिल्हा आणि सत्र न्यायालयात हा स्फोट झाला होता. त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. तर पाच जण जखमी झाले होते. पाकिस्तानचा पाठिंबा असलेली खलिस्तानवादी संघटना बब्बर खालसा यांचा या स्फोटामागे हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

ज्याने हा बॉम्ब न्यायालयात बसविला त्या गगनदीप नावाच्या व्यक्तीचा या स्फोटात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती बडतर्फ पोलिस अधिकारी होती. या स्फोटादरम्यान या व्यक्तीचा मोबाईल फोनही फुटला. पण त्याने त्यावेळी इंटरनेटच्या सुविधेसाठी डोंगलचा उपयोग केला. गगनदीपच्या हातावर असलेल्या टॅटूच्या मदतीने त्याची ओळख त्याच्या नातेवाईकांना पटली.  आता यासंदर्भात पोलिस पुढील तपास करत आहेत.

हे ही वाचा:

हार्बर मार्गावर एसी लोकलच्या काचा फोडल्या

सलमान खानला साप चावला

‘मन की बात’मधून पुण्याच्या भांडारकर इन्स्टिट्यूटचा गौरव

… म्हणून गोपीचंद पडळकरांनी महाराष्ट्र पोलिसांचा नाकारला अंगरक्षक

 

गगनदीप याला २०१९ मध्ये सेवेतून बडतर्फ करण्यात आले होते. अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती. अटक झाल्यानंतर दोन वर्षे गगनदीप तुरुंगात होता, अशी माहिती पंजाबचे डीजीपी सिद्धार्थ चटोपाध्याय यांनी दिली आहे. पंजाब विधानसभा निवडणूक जवळ आल्याने लुधियाना कोर्टातील बॉम्बस्फोटाने देशभरात खळबळ उडाली होती.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा