22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरराजकारण'त्या' वक्तव्याबद्दल अजित पवार यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे!

‘त्या’ वक्तव्याबद्दल अजित पवार यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे!

Google News Follow

Related

मुंबईत सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना उद्देशून एक वक्तव्य केले त्याबद्दल त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे अशी रोखठोक भूमिका भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी मांडली आहे. ते म्हणाले की, एसटी कर्मचाऱ्यांनी विलिनीकरणाचा विचार डोक्यातून काढून टाकावा, असे अजित पवार म्हणतात. विधानभवनात ते असे वक्तव्य करत आहेत तेव्हा त्यांच्यावर हक्कभंग आणला पाहिजे.

यासंदर्भात जय महाराष्ट्र या वाहिनीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना आमदार भातखळकर म्हणाले की, मुळात हे वक्तव्य केल्याबद्दल अजितदादांवर हक्कभंग आणला पाहिजे. एसटी विलिनीकरणाबाबत उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार समिती गठित आहे. समितीचा निर्णय आलेला नाही. त्याच्या आधीच अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत असे जाहीर करणे कायद्याला, नियमाला धरून नाही. त्यामुळे अजितदादांवर हक्कभंग आणला पाहिजे.

भातखळकर म्हणतात की, काय जमतंय या सरकारला मग. एसटीचे विलिनीकरण जमत नाही, परिक्षा घेता येत नाहीत,  पेट्रोल डिझेल दरवाढ कमी करता येत नाही आणि स्वतःची मतंही सुरक्षित ठेवता येत नाहीत. नाकर्ते, निर्लज्ज आणि निबर असे हे सरकार आहे. अजितदादांच्या या वाक्याला काही अर्थ नाही. जिथे इच्छा असेल तिथे मार्ग असतो.

हे ही वाचा:

लुधियाना कोर्टात पोलीस कर्मचाऱ्यानेच घडवला बॉम्बस्फोट

मंत्रालयात मंत्री उपस्थित नसतात… मुख्यमंत्र्यांकडे रोख?

नितेश राणेंची नवाब मालिकांना ट्विटरवरून टोलेबाजी

सनी लिओनीचे ‘मधुबन में राधिका नाचे’ गाणे वादात

 

कोणत्याही सरकारच्या काळात हे विलिनीकरण झाले नाही, असे यावर म्हटले जाते, त्याबद्दल विचारल्यावर आमदार भातखळकर म्हणतात की, कोणत्याही सरकारच्या काळात म्हणजे बहुसंख्य वेळेला यांचच सरकार होतं. जे आधीच्या सरकारने केलं नाही, ते तुम्ही करून दाखवलंत तर ते वैशिष्ट्य असतं ना. निर्णय घेण्यात कल्पकता, धाडसीपणा, संवेदनशीलतेची गरज असते. आज ४५ पेक्षा अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आतामहत्या केल्या आहेत. त्यांचा संप चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण ते सरकारविरोधात उभे ठाकले आहेत. संवेदनशील कायद्याला सोडून हे विधान आहे. न्यायालयीन लढाई चालू आहे तिथे ते जिंकतील अशी खात्री आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा