24 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरविशेषस्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकावरील आरोप बिनबुडाचे आणि खोटे!

Google News Follow

Related

कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी काँग्रेस नेते दीपक टिळक यांना दिले उत्तर

दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाची निवडणूक २६ डिसेंबरला होत असून त्यासाठी अध्यक्षपदासाठी उभे राहिलेले काँग्रेस नेते दीपक टिळक स्मारकावर केलेले कथित घोटाळ्याचे आरोप हे बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे स्मारकाचे कार्याध्यक्ष व स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजित सावरकर यांनी म्हटले आहे. दीपक टिळक हे जयंतराव टिळक यांचे पुत्र असून ते स्मारकाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला उभे राहिले आहेत.

यासंदर्भात सावरकर स्मारकाचे विश्वस्त रणजित सावरकर यांनी म्हटले आहे की, हे आरोप बिनबुडाचे म्हणजेच खोटे आणि कपोलकल्पित आहेत. सावरकर स्मारकाचा सर्व व्यवहार पारदर्शी आहे. त्यामुळे स्मारकाच्या सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की, त्यांनी स्मारकात प्रत्यक्ष येऊन सर्व गोष्टींची खात्री करून घ्यावी. दीपक टिळक यांच्या खोट्या आरोपांवर विश्वास ठेवू नये, असे त्यांनी नमूद केले आहे. टिळक यांनी लेखी स्वरूपात हे आरोप केले आहेत. दीपक टिळक हे लोकमान्य टिळकांचे नातू जयंतराव टिळक यांचे पुत्र होत.

रणजित सावरकर म्हणतात की, जर दीपक टिळक यांना स्मारकाची इतकी काळजी वाटत होती तर त्यांनी आधी नीट चौकशी करायला हवी होती, प्रत्यक्ष स्मारकात येऊन वस्तुस्थिती पाहायला हवी होती. पण आपल्या स्वार्थाकरता ते स्मारकाची बदनामी करत आहेत. एकतर दीपक टिळकांनी पूर्ण अभ्यास करून पत्र पाठवायला हवे होते. स्वतःला समजत नसेल तर कोणा तज्ज्ञाकडून आय-व्यय गणन समजून घ्यायला पाहिजे होते.

रणजित सावरकर म्हणतात की, जयंतराव टिळक यांच्या कार्याविषयी सर्वांनाच पूर्ण आदर आहे. त्यांनी स्मारकासाठी पैसे मिळवून दिले, ते स्मारकाच्या पहिल्या फेजसाठी. दुसऱ्या फेजमध्ये दीपक टिळक यांचे मित्र राजीव बोडस यांना कंत्राट देण्यात आले. ऑडिटोरियम, म्युझियम अशा अनेक गोष्टी बोडस पूर्ण करून देणार होते. जुना कार्यालयाचा भाग तसाच ठेवण्यात आला. त्यामुळे आमच्या हाती नव्या इमारतीतील आला तो फक्त सांगाडा. बोडस यांनी स्मारकाची संपूर्ण फसवणूक केली आहे. स्मारकाला फसवून त्यांनी अर्धी अधिक जागा हडप केली असून त्याचे भाडे आजही बोडस घेत आहेत. त्यांच्या स्वतःच्या एन एस सॉफ्टवेअर या कंपनीचे कार्यालयही स्मारकातच आहे. आज वस्तुस्थिती ही आहे की ६० % जागा बोडसांच्या ताब्यात आहे आणि फक्त ४० % जागा स्मारकाकडे आहे.

दीपक टिळक लिहितात, मी बांधकामाकरता कर्ज मिळवून दिले. पण त्यांनी स्मारकाची जागाच गहाण टाकून त्यांचे मित्र, केसरीवाड्याचे विकासक राजीव बोडस यांना २२ कोटीचे कर्ज मिळवून दिले ही वस्तुस्थिती आहे. या बेकायदेशीर व्यवहाराविरुद्ध राजीव बोडस यांच्याविरुद्ध स्मारकाने फौजदारी दावा दाखल केला आहे. आता स्वत: दीपक टिळक यांनी हे कर्ज मिळवून दिल्याची कबुली दिल्याने त्यांचेही नाव या दाव्यात घालावे, असा अर्ज लवकरच वकिलांच्या सल्ल्याने करण्यात येईल, असा इशारा रणजित सावरकर देतात.

आत्ता संस्था दीड कोटी रुपये तोट्यात आहे असे टिळक लिहितात. पण दरवर्षी चाळीस लाख नफा होत होता हेही ते मान्य करतात. मग ते कर्तृत्व कोणाचे? त्या नफ्यातूनच, तुम्ही पूर्ण न केलेले उत्तम नाट्यगृह झाले. स्मारकाचे अद्ययावत कार्यालय, लाईट अँड साऊंड शो, क्रोमा आणि ऑडिओ डबिंग स्टुडिओ, हे मृत्युंजयचे १४७ (+६ हिंदी) प्रयोग, शिखर सावरकर मोहीम, लडाखमध्ये शिबीर, भगूरच्या सावरकर वाड्याची देखभाल अशा असंख्य गोष्टी झाल्या त्या या नफ्यातूनच.

सावरकर पुढे नमूद करतात की, टिळकांनी स्मारकाला दीड कोटी तोटा झाल्याचे म्हटले आहे. झाला, पण तो कोरोनाच्या काळात, जेव्हा सारे जगच ठप्प होते. त्या दीड कोटीतून depreciation (१,१०,३६,९८२/-) + municipal & other taxes (३४,८९,९३१/-) वजा केले तर नक्त तोटा ९ लाख ६० हजार आहे. (ज्याला operational loss असे म्हणतात.) गेल्या दोन वर्षात मोठ्यामोठ्या कंपन्यासुद्धा बंद पडल्या तरी स्मारक अजूनही सारे निभावून नेऊ शकत आहे ते आम्ही केलेल्या आर्थिक नियोजनामुळेच.

सुहास बहुलकर यांनी मिळवलेली अंदमान जेलची प्रतिकृती, सावरकर पुतळा, बेड्या, लोखंडी दरवाजे याचे काय झाले असे टिळक विचारतात. स्मारकात आले असते तर दर्शनी भागातच ठेवलेली, (जयंतराव टिळक यांनी मिळवलेली) अंदमानातील सेल्युलर जेलची प्रतिकृती त्यांना दिसली असती. पण ते गेल्या पंधरा वर्षात इकडे फिरकलेलेच नाहीत तर त्यांना ते कसे दिसणार ?

हे ही वाचा:

उर्फी जावेद वाचत आहे भगवद्गीता!

राज्यात येणार शक्ती कायदा! विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात विधेयक मंजूर

धक्कादायक! महाराष्ट्रातील २४ हजार महिला गायब

उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे मागील सरकारचे पाप

 

‘१८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामा’ची हस्तलिखित प्रत स्मारकाला तात्पुरती दिली होती, असे दीपक टिळक लिहितात. ती स्मारकाचीच होती आणि ती प्रतच काय पण सावरकरांच्या उर्दू कविता असलेली वहीसुद्धा स्मारकात व्यवस्थित जपून ठेवण्यात आली आहे. अनेकजण येऊन भक्तिभावाने त्याचे दर्शन घेत असतात. खरेतर स्मारकाचे काम चालू असताना केसरी वाड्यात तात्पुरत्या नेलेल्या अनेक गोष्टी (सावरकरांची पत्रे, वंदे मातरम्‌ ध्वज इ.) स्मारकात परत आलेल्या नाहीत.

सावरकर विचारांचा प्रचार हे स्मारकाचे मुख्य उद्दिष्ट आहे, दीपक टिळक ज्या पद्धतीने केसरीवाड्यात लग्न समारंभ आणि टिळक स्मारक मंदिरात टिळकांचे म्युरल झाकून, कपड्यांचे प्रदर्शन लावून पैसे कमावत आहेत तसं स्मारकात कधीच घडलेले नाही, घडणार नाही, असेही रणजित सावरकर म्हणतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा