प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जेव्हा देशातील सर्व मानाच्या पुरस्कारांचे मानकरी जाहीर करण्यात आले. या जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राचे पोलिस अधिकारी श्री. अजय जोशी यांचा समावेश आहे. अजय जोशी यांना राष्ट्रपती पोलिस पदकाने गौरविण्यात येणार आहे.त्यांच्या वडिलांना हा पुरस्कार मिळाला होता हे विशेष
अजय जोशी गेले २५ वर्ष पोलिस खात्यात नोकरी करत असून सध्या ते आर्थिक गुन्हे शाखेत पोलिस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. या पूर्वी जोशी यांनी गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी पथकातही काम केले आहे. राष्ट्रपती पोलिस पदक हे पोलिस खात्यात अमुल्य असे योगदान देणाऱ्या अधिकाऱ्यांना दिले जाते. ज्यांनी पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ पोलिस खात्यात दिला आहे, अशा एका सक्षम अधिकाऱ्याची या पुरस्कारासाठी वर्णी लागावी हे निश्चितच समाधानकारक आहे.
विशेष बाब म्हणजे त्यांच्या वडिलांनाही राष्ट्रपती पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले होते. “हा पुरस्कार जाहीर झाला तेव्हा मला खरोखरच फार आनंद झाला. माझ्या वडिलांनाही हा पुरस्कार प्राप्त झालेला असल्याने या पुरस्काराचा आनंद द्विगुणीत झाला आहे. हा पुरस्कार माझ्या वडिलांना मिळाला होता. मी हा पुरस्कार वडिलांना समर्पित करतो” अशी प्रतिक्रिया अजय जोशी यांनी न्युज डंकाशी बोलताना दिली.