दिल्लीमध्ये दिनांक २६ जानेवारी २०२१ ला प्रजासत्ताक दिनाच्याच निमित्ताने आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅलीची योजना केली होती. या रॅलीच्या नावाखाली अनेक ठिकाणी मोठ्या प्रेमात हिंसाचार घडवून आणला. लाल किल्ल्यावर स्वतःचा झेंडा लावण्याचा दुर्दैवी प्रकारसुद्धा घडला.
या सर्व प्रकारात शेतकऱ्यांच्या नावाखाली स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणारे नेते आणि संगठनांनी उघडपणे घडलेल्या प्रकारची जवाबदारी घेतलेली नाही. या संगठनांचे नेते आणि काही राजकीय पक्षांचे नेते देखील या आंदोलनकर्त्यांना चिथावत होते. दिल्ली पोलीस आणि गुप्तचर संस्थांनी या पूर्वीच खालिस्तानी संगठना आणि पाकिस्तानी आयएसआयचा या आंदोलनाला पाठिंबा असल्याची माहिती दिली होती. काँग्रेस पक्षाचे लुधियानाचे खासदार रवनीत सिंग बिट्टू यांनीदेखील काही आंदोलकांना खालिस्तान्यांकडून काही लाख रुपये दिली जात आहेत अशी माहिती दिली होती. खालिस्तानी झेंडे फडकवण्यासाठी पैसे दिले जात आहेत, असा खुलासाही त्यांनी केला. या सगळ्या माहितीनंतरही दिल्ली पोलिसांनी सामंजस्याची भूमिका घेऊन रॅलीकरता एक मार्ग आखून दिला होता. परंतु शेतकऱ्यांनी तोही मार्ग धुडकावून दिला आणि बॅरिकेडस उधळून लावून रॅलीला सुरवात केली.
लाल किल्ल्यावर प्रजासत्ताक दिनी झालेला प्रकार याला जवाबदार कोण आणि या सगळ्या हिंसाचाराची जवाबदारी कोण घेणार? या सगळ्या विषयांवर भाष्य करणारा हा आमचा व्हिडिओ नक्की बघा.