25 C
Mumbai
Wednesday, January 8, 2025
घरविशेष१९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; यश धुल करणार नेतृत्त्व

१९ वर्षांखालील विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; यश धुल करणार नेतृत्त्व

Google News Follow

Related

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) नुकतेच ट्वीट करत आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. भारतीय क्रिकेटच्या कनिष्ठ निवड समितीने वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या २०२२च्या १९ वर्षांखालील विश्वचषकासाठी ही संघ निवड केली असून यावेळी कर्णधारपद दिल्लीच्या यश धुल याला सोपवण्यात आले आहे.

आगामी १९ वर्षांखालील विश्वचषकाचा रणसंग्राम १४ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत वेस्ट इंडिजमध्ये पार पडणार आहे. यंदाचा हा १४वा विश्वचषक असून यावेळी एकूण ४८ सामन्यांमध्ये १६ संघ विश्वचषकाला गवसणी घालण्यासाठी एकमेंकाविरुद्ध मैदानात उतरतील. आतापर्यंत १९ वर्षांखालील विश्वचषक मिळवण्याचा विक्रम भारताच्या नावावर असून सर्वात जास्त म्हणजेच चार वेळा भारताने विश्वचषकाला गवसणी घातली आहे.

हे ही वाचा:

शास्त्रज्ञाने घडवला रोहिणी न्यायालयात स्फोट 

व्हॅटिकनच्या भेटीत पोप फ्रान्सिस काय म्हणाले होते, पंतप्रधान मोदींना

‘सत्तेच्या अनेक उलथापालथनंतरही गोवा भारतीयत्व विसरला नाही; भारत गोव्याला विसरला नाही’

गोवा मुक्ती दिनावर बाळासाहेबांनी काढलेले हे भन्नाट व्यंगचित्र

भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ मध्ये विश्वचषक जिंकला होता. २००० साली मोहम्मद कैफच्या नेतृत्त्वात भारताने पहिल्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला होता. त्यानंतर २००८ मध्ये विराटच्या नेतृत्त्वात भारताने विश्वचषक जिंकला होता. २०१२ मध्ये उन्मुक्त चंदच्या नेतृत्वाखाली आणि २०१८ मध्ये पृथ्वी शॉच्या नेतृत्त्वाखाली भारताने ही स्पर्धा जिंकली होती.

बीसीआयने जाहीर केलेला संघ  

यश धुल (कर्णधार), हरनूर सिंग, अंगक्रीश रघुवंशी, एस के रशिद (उपकर्णधार), निशांत सिंधू, सिद्धार्थ यादव, अनीश्वर गौतम, दिनेश बाना (यष्टीरक्षक), आराध्य यादव (यष्टीरक्षक), राज अंगद बावा, मानव पारख, कौशल तांबे, आर एस हंगरगेकर, वासू वॅट्स, विकी ओत्सवाल, रवी कुमार, गर्व सांगवान

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा