24.6 C
Mumbai
Sunday, January 5, 2025
घरराजकारण'अमित शाह यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले'

‘अमित शाह यांनी साखर कारखान्यांना इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले’

Google News Follow

Related

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सध्या पहिल्या सहकार परिषदेनिमित्त महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी फडणवीसांनी सहकार चळवळ मोडीत निघाली असे म्हणणारेच साखर कारखाने विकत घेत आहेत, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी महाविकास आघाडीमधील नेत्यांवर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकारला जागविण्याचे काम केले असे फडणवीस म्हणाले. अमित शाह हे सहकारी चळवळीतून तयार झालेले नेते आहेत. एमएसपी लावल्याने साखर कारखाने तरले आहेत. आज इथेनॉल निर्मितीमुळे कारखान्यांची स्थिती सुधारली. शिवाय इथेनॉलच्या नव्या धोरणामुळे साखर कारखान्यांचे दिवस पालटले. साखर कारखान्यांना अमित शाह यांनी इन्कम टॅक्सच्या जाचातून सोडवले आणि ३० वर्षाचा प्रश्न मार्गी लागला, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

हे ही वाचा:

‘अशोकराव, उद्धवजी मुख्यमंत्री नसते तर तुम्ही कुठे असता?’

‘अमरावतीची घटना पुन्हा घडली तर त्यांना सोडायचे नाही’

अनिल परब, हा तुझ्या बापाचा पैसा आहे का?

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे की अनिल परब?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. प्रवरा नगर इथल्या देशातल्या पहिल्या सहकारी परिषद आणि शेतकरी मेळाव्याला उपस्थित राहिले आहेत. महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना नव्या नजरेतून पाहण्यासाठी या कारखान्यांचा सखोल अभ्यास केला असल्याचे आणि राज्य सरकारने राजकारण बाजूला ठेऊन सहकार चळवळीकडे पहावे असे अमित शहा म्हणाले. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नगर इथे विखे पाटील यांच्या पुढाकारातून हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
219,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा