25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेष‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा

‘या’ तारखेपासून होणार दहावी- बारावीच्या परीक्षा

Google News Follow

Related

राज्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या तारखा जाहीर केल्या आहेत. यंदा दहावी- बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार असून परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना परीक्षा द्याव्या लागणार आहेत. बारावीची परीक्षा ४ मार्च ते ७ एप्रिल या कालावधीत होणार आहे तर दहावीची परीक्षा १५ मार्चे ते १८ एप्रिल दरम्यान होणार आहे.

कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षांना मुकले होते. महत्त्वाच्या परीक्षांचे गुण मूल्यमापनाच्या आधारे देण्यात आले होते. सध्या जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रॉनचा शिरकाव भारतात आणि विशेषतः राज्यात झाला असून यंदातरी परीक्षा होणार का? असा सवाल अनेक विद्यार्थ्यांना आणि पालकांना पडला होता. यासंदर्भात वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत, दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.

हे ही वाचा:

शरद पवार वाचणार स्वातंत्र्यवीर सावरकरांचे चरित्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, नैसर्गिक शेतीकडे वळण्याची हीच वेळ!

पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली ट्विटरवर ठरले सर्वाधिक लोकप्रिय!

बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू झाल्यामुळे हाताला काम मिळेल!

वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार असून त्यानंतर १५ मार्चपासून दहावीच्या परीक्षा सुरू होतील. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध होणार आहे. १४ फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत, तर २५ फेब्रुवारी ते १४ मार्च दरम्यान दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

ओमिक्रॉनसंदर्भात राज्य शासन खबरदारी घेत असून त्याबाबत राज्य सरकारने काही नियमही लागू केले आहेत. या नियमांचे पालन करून दहावी आणि बारावीची परीक्षा पार पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि पालकांना घाबरून जाण्याचे कारण नाही, असे आवाहन वर्षा गायकवाड यांनी केले आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा