म्हाडाची परिक्षा ऐनवेळी रद्द करून परिक्षार्थींना निराशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या राज्यातील मविआ सरकारच्या गलथान, विद्यार्थी विरोधी कारभाराचा निषेध करण्यासाठी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी हल्लाबोल करून संतप्त निदर्शन केली. अभाविपच्या कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. पेपर फुटी, परीक्षा रद्द आणि विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारमय ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील माविआ सरकारची ओळख झाली आहे. या विरोधात अभाविपने जोरदार आंदोलन केले.
यावेळी राष्ट्रवादीच्या गुंडांनी परिषद कार्यकर्त्यां शिवीगाळ करून हल्ला केला. राष्ट्रवादीच्या गुंडांनी विद्यार्थीनी कार्यकर्त्यांनाही सोडले नाही. यावेळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी राष्ट्रवादीच्या गुंडांच्या विरोधात बघ्याची भूमिका घेऊन अभाविप कार्यकर्त्यांवर लाठीमार केला. अभाविपने पोलिसांच्या राष्ट्रवादीच्या गुंडांना सरंक्षण देण्याच्या भूमिकेचा तीव्र धिक्कार केले आहे. म्हाडाच्या विद्यार्थ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी आंदोलन अधिक व्यापक करण्याचा निर्धार अभाविपने केला आहे.
हे ही वाचा:
अंधेरीतील बारच्या तळघरातून १७ मुलींची सुटका
‘म्हणून’ फ्रांससाठी रविवार ठरला ऐतिहासिक
मोदींनी कशी विश्वनाथ मंदिरातून, नागरिकांकडे ‘या’ तीन प्रतिज्ञा मागितल्या
अभाविपचे कोकण प्रांत मंत्री अमित ढोमसे, माजी मंत्री प्रेरणा पवार, सहमंत्री नीरज कुरकुटे, यांच्यासह योगेश्वर राज पुरोहित, सूरज लोकरे, शुभम शिंदे, शंकर संकपाळ, प्रणव वांडेकर, ओम मांढरे, धीरज नलावडे, वैष्णव देशमुख यांच्यासह चाळीस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.