शेतकरी आंदोलनाच्या आडून राजकीय हिशोब चुकते करण्याचा प्रकार आझाद मैदानातही झाला. राष्ट्रवादी काँग्रसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत कट्टरवादी मुस्लीम नेता अबू आजमी याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर अनर्गल टीका केली.
आझाद मैदान येथील सभेत अबू सारख्या टीचभर नेत्याने शेतक-यांच्या आडून राष्ट्रवादी शक्तींवर तोंड सुख घेतले. ‘पंजाबमधून निघालेली ही वावटळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उडवून लावेल. केंद्र सरकार कृषी कायदा मागे घेत नाही तोपर्यंत देशात आगडोंब उसळू दे’, असे जहाल भाषण अबूने केले.
काहीही संदर्भ नसताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील माफीनाम्याच्या तद्दन बोगस आरोपाचा अबूने भाषणात उल्लेख केला.
अबूचे भाषण सुरू असताना पवार मंचावर होते. त्याच्या भाषेवर पवारांनी कोणताही आक्षेप घेतला नाही.
अबू हा स्वत: मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाचा आरोपी होता. पुराव्या अभावी त्याच्या सुटका झाली. त्याचे माफीया दाऊद ईब्राहीमशी संबंध असल्याची चर्चा आहे. अबूचा पुतण्या अबू अस्लम याला दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ४० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी २०१७ मध्ये अटक केली होती. तो एका आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटसाठी काम करीत असल्याचे उघड झाले होते.