24 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरराजकारणमुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी

मुंबईत १४४ ‘कलम’; एमआयएमच्या सभेला गर्दी

Google News Follow

Related

मुंबई पोलिसांनी १० तारखेच्या मध्यरात्रीपासून १२ डिसेंबरपर्यंत रॅली, मोर्चे, आंदोलने यांना परवानगी नाकारली खरी, पण जमावबंदीचे १४४ कलम लागू केलेले असतानाही चांदिवली येथे एमआयएमची सभा मात्र होते आहे. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरे सरकारच्या बोटचेप्या धोरणावर टीका केली जात आहे.

ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे मुंबईत १४४ कलम लागू करून मोर्चे, सभा, रॅली यांना बंदी घालण्यात आली आहे. पण एमआयएम पक्षाने चांदिवली भागात सभेचे आयोजन केले. एमआयएमचे असदुद्दीने ओवेसी यांचे भाषण त्याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.

या सभेसाठी औरंगाबादहून खासदार इम्तियाज जलील हे मुंबईत दाखल होत आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या रस्त्यांत ठिकठिकाणी थांबविण्यात आल्या आहेत. पण जलील यांची गाडी मात्र पुढे जाऊ दिलेली आहे. त्यावरूनही ठाकरे सरकारवर टीका होत आहे.

हे ही वाचा:

ऋतुराजला आला बहर, झळकाविले तिसरे शतक

सौदी अरबमध्ये तब्लिघी जमातवर बंदी

‘ओबीसी आरक्षण संपवण्याचा ठाकरे सरकारच्या षडयंत्राचा डाव उघड’

बांधकाम व्यावसायिकाने म्हाडालाच घातला गंडा

 

यासंदर्भात भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, ही दोन दिवसांसाठी केवळ एक राजकीय ढोंगबाजी. कारण या ढोंगी ठाकरे सरकारला हे ठाऊक आहे की, ते मुस्लिम समाजाला आरक्षण देऊ शकत नाहीत. तेव्हा त्यांनी रॅली, मोर्चा, सभा यांच्यावर कोरोनाच्या नावाखाली बंधने आणली आहेत. पण या सरकारमधील पक्ष मात्र नियमितपणे रॅली, सभा घेत असतात तेव्हा त्यांना कोरोनाचा विसर पडतो. २८ डिसेंबरला राहुल गांधी यांची सभाही इथे होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा