29 C
Mumbai
Tuesday, December 17, 2024
घरविशेषविकी आणि कतरिना लग्न बंधनात

विकी आणि कतरिना लग्न बंधनात

Google News Follow

Related

बॉलीवूडमधील बहुचर्चित विवाह सोहळा अखेर संपन्न झाला आहे. काल (९ डिसेंबर) अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल हे लग्न बंधनात अडकले आहेत. राजस्थानमध्ये हा शाही विवाह थाटात पार पडला असून या वर्षातील हा सर्वात मोठा विवाह सोहळा होता.

काल विकी कौशल आणि कतरिना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून लग्नाचे फोटो शेअर करत त्यांच्या लग्नाची बातमी दिली. त्यांनी त्यांच्या पुढील नव्या प्रवासासाठी आशीर्वादही मागितले आहेत.

गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना आणि विकी यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर ९ डिसेंबरला त्यांचा विवाह संपन्न झाला. राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट येथे हा शाही विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. दोन्ही कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांसोबत मेहंदी आणि संगीत समारंभ पार पडला.

हे ही वाचा:

सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनावर चीनचा मुखपत्रातून कांगावा

बिपीन रावत यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

रोहित आता ‘टॉप’ वर

कोण होणार नवे CDS?

त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावरही जोरदार चर्चा असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होताना दिसून येत आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार कतरिना आणि विकीच्या लग्नाला हजेरी लागवणाऱ्या पाहुण्यांसाठी काही खास नियम आणि अटी ठेवण्यात आल्या होत्या. लग्नाला येण्यासाठी पाहुण्यांना खास निमंत्रण कोड देण्यात आला होता. तसेच लग्नासंबंधित फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यास मनाई होती. तसेच पाहुण्यांना लग्नात मोबाईल फोन न वापरण्याची अटही ठेवण्यात आली होती. मात्र, त्यांच्या लग्न सोहळ्याचे आणि त्या ठिकाणाचे काही फोटो आधीच व्हायरल झाले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
214,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा