25 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेषसीडीएस हेलिकॉप्टर अपघात: राजनाथ सिंग संसदेत माहिती पुरवणार

सीडीएस हेलिकॉप्टर अपघात: राजनाथ सिंग संसदेत माहिती पुरवणार

Google News Follow

Related

तामिळनाडूतील निलगिरीमध्ये लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या अपघाताबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेला माहिती देणार आहेत. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, बिपिन रावत, त्यांचे कर्मचारी आणि कुटुंबातील सदस्य एमआय-सीरीज हेलिकॉप्टरवर होते, जे कोईम्बतूर आणि सुलूर दरम्यान असलेल्या कुन्नूर येथे क्रॅश झाले. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून दोन जण वाचले आहेत. त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार हेलिकॉप्टरमध्ये १४ जण होते – त्यापैकी नऊ प्रवासी आणि पाच क्रू सदस्य होते.

लष्कराच्या प्रोटोकॉलचे पालन करून, सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आधीच या विषयावर माहिती दिली आहे. असे सूत्रांनी सांगितले. भारतीय हवाई दलाने या अपघाताची माहिती दिली आहे. “सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्यासह IAF Mi-17V5 हेलिकॉप्टरचा आज तामिळनाडूच्या कुन्नूरजवळ अपघात झाला. अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” असे ट्विटमध्ये म्हटले आहे.

घटनास्थळी बचाव आणि मदत कार्य सुरू आहे, जे भूभागामुळे कठीण झाले आहे. तामिळनाडू सरकारने वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपघातस्थळी पाठवले आहे. उटी येथील वैद्यकीय पथक आणि कोईम्बतूर येथील तज्ज्ञ घटनास्थळी दाखल झाले आहेत.

माजी लष्करप्रमुख जनरल जेजे सिंग यांनी माध्यमांना सांगितले की, सापडलेले मृतदेह पूर्णपणे जळलेले आहेत, त्यामुळे ओळख पटवणे कठीण होत आहे. तर बचावलेल्यांना गंभीर दुखापत झाली आहे. हेलिकॉप्टरने कोईम्बतूरच्या सुलूर येथील लष्करी तळावरून उड्डाण केले होते आणि ते उधगमंडलममधील वेलिंग्टनला जात होते. जनरल रावत हे तिथे असलेल्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजला भेट देणार होते.

हे ही वाचा:

भारत अरब देशांना अन्न पुरवठा करणार

सीडीएस बिपीन रावत यांचे हेलिकॉप्टर कोसळले

प्राजक्त तनपुरे किरीट सोमय्यांच्या रडारवर

…म्हणून पंतप्रधान मोदींनी थोपटली योगींची पाठ

Mi सीरीज हेलिकॉप्टर हे भारतीय वायुसेनेचे वर्कहॉर्स आहेत आणि ते उच्च उंचीवरील ऑपरेशन्समध्ये वापरले जातात. त्यांचा उपयोग पंतप्रधानांसह अनेक व्हीआयपींच्या प्रवासासाठीही केला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा