24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणभाजपा-शिवसेनेचे नगरसेवक परस्परांना भिडले

भाजपा-शिवसेनेचे नगरसेवक परस्परांना भिडले

Google News Follow

Related

वरळी बीडीडी चाळीतील आग दुघर्टनेत भाजलेल्या रुग्णांवर उपचार करण्यात नायर रुग्णालयाने केलेल्या दिरंगाईबाबतच्या चर्चेत शिवसेना आणि भाजप परस्परांना भिडले.

मुंबई महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी भाजपच्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्यावरून हा वाद पेटला आणि भाजपच्या या ११ नगरसेवकांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर चाल करत त्यांना घेराव घातला. यामध्ये दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर यांनी १५ मिनिटांकरता सभागृहाचे कामकाज तहकूब केले.

काही लोक या प्रकरणाचा शोध घेण्याऐवजी पळ काढत आहेत, असे वक्तव्य यशवंत जाधव यांनी केल्यानंतर भाजप नगरसेवक आक्रमक झाले आणि राजीनामा दिलेल्या ११ आरोग्य समिती सदस्यांनी त्यांच्या आसनाच्या दिशेने धाव घेतली. भाजपच्या नगरसेवकांनी धाव घेतल्यामुळे मग शिवसेनेचेही नगरसेवकही प्रतिकार करण्यासाठी सरसावले. यावेळी दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. यशवंत जाधव यांनी आपला शब्द मागे घ्यावा, अशी मागणी करत भाजपने तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. प्रकरण अगदी हमरीतुमरीवर आले होते. शेवटी ज्येष्ठ नगरसेवकांनी मधे पडत  कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची काळजी घेतली.

 

हे ही वाचा:

सोनिया गांधी, राहुल गांधी पंतप्रधान होण्यासाठी पात्र आहेत का?

पाकिस्तानात ईश्वरनिंदेवरून एका श्रीलंकन नागरिकाची निघृण हत्या

लोकप्रियतेत पंतप्रधान मोदी पुन्हा आघाडीवर; राहुल गांधींचा कोणता क्रमांक?

एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा

 

याप्रकरणी बोलतांना भाजपचे प्रवक्ते व नामनिर्देशित नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी शिवसेनेची भूमिका बेताल असून गंभीर विषयावर चर्चा असताना यशवंत जाधव यांनी राजकारण केले, असे सांगितले. भाजपच्या नगरसेवकांनी रुग्णालयाला दिलेली भेटही त्यांना झोंबल्याचे सांगत शिरसाट म्हणाले की, आरोग्य समितीच्या सदस्यांनी दिलेले राजीनामे त्यांना आवडले नाहीत. त्यामुळे त्या रुग्णालयात भाजपचे कुणी फिरकले नसल्याचा त्यांनी दावा केला. त्यांचा निषेध करण्यासाठी सभागृह बंद पाडले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा