पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मुंबई दौऱ्याची चांगलीच चर्चा रंगली होती. पण आता ममता यांचा हा दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मुंबई येथे आयोजित एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला आहे. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्यावर चांगलीच टीका होताना दिसत आहे. पण या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्यांपैकी एकानेही ममता यांना या कृतीसाठी जाब विचारला नाही. ते सर्वजण मूग गिळून गप्पा होते. त्यामुळे या उपस्थितांवरही टीकेची झोड उठली आहे.
बुधवार, १ डिसेंबर रोजी ममता बॅनर्जी त्यांनी आपल्या मुंबई दौऱ्या दरम्यान एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमा दरम्यान ममता बॅनर्जी यांनी महाराष्ट्रातील लेखक, विचारवंत, पत्रकार, कलाकार, बुद्धिजीवी अशा लोकांसोबत संवाद साधला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री स्वरा भास्कर, अभिनेत्री रिचा चढ्ढा, पत्रकार राजू परुळेकर, लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, स्टँड अप कॉमेडियन मुनव्वर फारुकी अशी अनेक मंडळी उपस्थित होती. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये हा कार्यक्रम पार पडला.
हे ही वाचा:
किशोर गट राष्ट्रीय खोखोत महाराष्ट्राला दुहेरी विजेतेपद
ममता बॅनर्जी यांनी केला राष्ट्रगीताचा अपमान!
शाळाबंदी करून शिक्षण व्यवस्था मोडीत काढण्याचा ठाकरे सरकारचा डाव
‘नायर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांच्या मुलाचा मृत्यू’
या कार्यक्रमात छोटे भाषण केल्यावर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीत अर्धवट गायले. ….पंजाब सिंधू गुजरात मराठा, द्राविड उत्कल बंग इथपर्यंत गाऊन त्यांनी जय भारत, जय मराठा, जय बंगाल अशी घोषणा देत कार्यक्रम संपवला. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या एकालाही ममता यांच्या या कृतीचा निषेध करावासा वाटले नाही किंवा राष्ट्रगीत पूर्ण करावेसे वाटले नाही.
यावरून भाजपा नेते आमदार अतुल भातखळकर यांनी या सर्व मंडळींवर टीकास्त्र डागले आहे. “काल मुंबई येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताची मोडतोड केली. तेव्हा कार्यक्रमाला उपस्थित असलेले अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून बसले होते.” असे ट्विट भातखळकर यांनी केले आहे.
काल मुंबई येथे आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रगीताची मोडतोड केली.
तेव्हा कार्यक्रमाला उपस्थित असलेले अर्धवट बुद्धिवादी मूग गिळून बसले होते. pic.twitter.com/1dn7F5i5Il— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 2, 2021