30 C
Mumbai
Monday, November 18, 2024
घरविशेषपराग अगरवाल यांना मिळणार वर्षाचा पगार १० लाख डॉलर

पराग अगरवाल यांना मिळणार वर्षाचा पगार १० लाख डॉलर

Google News Follow

Related

ट्विटरचे सीईओ म्हणून भारतीय वंशाचे पराग अग्रवाल यांनी यांच्यावर जबाबदारी सोपविलेली असताना सीईओंच्या उच्चभ्रू यादीत त्यांचे नाव सामील झाले आहे. कारण आता पराग अग्रवाल यांना भरघोस पगार, भत्ता आणि किफायतशीर स्टॉकचे पर्याय मोकळे झाले आहेत. तसेच त्यांना मिळणारे वार्षिक उत्पन्नही घसघशीत असेल.जगातील सर्वाधिक पगार घेणार्‍या अधिकार्‍यांच्या प्रतिष्ठित यादीत ते सामील झाले आहेत. भारतीयांसाठी ही एक अभिमानाची बाब आहे.

उच्चभ्रू यादीतील इतर सीईओच्या तुलनेत अग्रवाल नवखे तर आहेतच पण वयाने सुद्धा कमी आहेत. पण असे असले तरी जागतिक स्तरावर ट्विटरच्या वाढत्या प्रभावांव्यतिरिक्त ते आर्थिक कमाईच्या बाबतीतही आघाडीवर राहतील.  त्यांचा वार्षिक पगार १० लाख डॉलर इतका असेल.  त्याशिवाय त्यांना १ कोटी २५ लाख डॉलर इतक्या मूल्याचे प्रतिबंधित स्टॉक युनिट्स देखील मिळणार आहेत जे फेब्रुवारी २०२२ पासून १६ समान तिमाही वाढीत मिळतील.

 

हे ही वाचा:

शिवसेनेच्या नेत्याने सांगितले म्हणून हॉटेल पाडले

‘ममता यांना हिंदू राष्ट्र मान्य नसेल तर शिवसेनेची भूमिका काय?’

युक्रेनमध्ये नेटो ही धोक्याची घंटा

निलंबित कम्युनिस्ट खासदाराला स्वातंत्र्यवीर सावरकर द्वेषाची उबळ

 

अग्रवाल हे आयआयटी बॉम्बेचे पासआउट आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये पीएचडी केली आहे. २०११ मध्ये सॉफ्टवेअर अभियंता म्हणून कंपनीत रुजू झाल्यानंतर ऑक्टोबर २०१७ पासून ट्विटरचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी होते.
उच्चभ्रू यादीत असणारे अल्फाबेट कंपनी चे सीईओ सुंदर पिचाई यांना २०१९ मध्ये एकूण २८ कोटी डॉलर इतके उत्पन्न मिळाले. ते जगातील सर्वात मोठ्या पगारदारांपैकी एक आहेत. सत्या नडेला (५४) मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष आणि सीईओ यांनी त्याच वर्षी ४ कोटी ३० लाख डॉलर्सची कमाई केली तर शंतनू नारायण ( ५८ ) यांना ३ कोटी ९ लाख डॉलर मिळाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा