29 C
Mumbai
Friday, October 25, 2024
घरविशेषबारामतीत ‘शून्य’ स्वच्छता

बारामतीत ‘शून्य’ स्वच्छता

Google News Follow

Related

केंद्र सरकारमार्फत २०१४पासून राबविण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानात महाराष्ट्रातील बारामती जिल्हा सातत्याने मागे पडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि शरद पवार यांचे वर्चस्व असलेल्या या जिल्ह्याला २०२१मध्ये स्वच्छतेच्या बाबतीत शून्य गुण मिळाले आहेत.

राज्यात पन्नास हजार ते एक लाख लोकसंख्या असलेल्या नगर परिषदेच्या स्वच्छता स्पर्धेत सलग चार वर्षे बारामतीवर नापास होण्याची नामुष्की ओढविली आहे. सत्ताधाऱ्यांच्या राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे ही अवस्था आल्याचे बोलले जात आहे.

बारामतीच्या या स्वच्छता अभियानात हागणदारीमुक्त दर्जामध्ये ८०० पैकी ५०० गुण मिळाले आहेत तर प्रत्यक्ष पाहणीत २४०० पैकी १५४३ गुण मिळाले आहेत. नागरिकांच्या अभिप्रायात १८०० मधून १३०३ गुण मिळाले आहेत. पण कचरामुक्त शहर या परीक्षेत मात्र बारामती सपशेल नापास झाले असून १००० पैकी एकही गुण या शहराला मिळालेला नाही.

बारामतीच्या या अवस्थेबद्दल निलेश राणे यांनी खोचक ट्विट करत टीका केली आहे. पवार सगळ्यात नापास, एक तालुका, एक शहर सांभाळता येत नाही आणि म्हणे पवार पंतप्रधानपदाचे दावेदार. महाराष्ट्राची वाट लावली या कुटुंबाने पण फक्त आम्ही फार मोठे आहोत हे दाखवण्यात यशस्वी ठरले. बाकी कामं सगळी बोगस, अशा शब्दांत निलेश राणे यांनी हल्लाबोल केला आहे.

राजकीय कुरघोड्यांमुळेच स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे. नगरसेवकांमधील अंतर्गत वादामुळेही स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहेत, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

या शून्य गुणांमागे जी कारणे दिली जात आहेत त्यात शहरातील सार्वजनिक स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली आहे. घनकचरा प्रकल्पावरही केवळ चर्चाच होत आहे. आरोग्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी कामाकडे दुर्लक्ष केल्याचा फटकाही बसला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा