मुंबईतील शाळा १ डिसेंबरपासून सुरू होणार होत्या पण पुन्हा एकदा निर्णयाच्या बाबत चालढकल पाहायला मिळाली असून आता पहिली ते सातवी इयत्तेपर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातही शाळा सुरू होण्याबाबत संभ्रम कायम आहे. सातवी ते १२वीपर्यंतचे वर्ग सुरू राहतील का हे मात्र स्पष्ट झालेले नाही.
कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेली दोन वर्षे बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू होत असताना आता अचानक मुंबईतील पहिली ते सातवीच्या मुलांची शाळा १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येणार आहेत. पुणे, नाशिकमध्येही १ डिसेंबरपासून शाळा सुरू करण्याबाबत निश्चित काही ठरलेले नाही.
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियन्टमुळे पुन्हा एकदा चाचण्या, लसीकरण, निर्बंध यांचा विचार सुरू झाला आहे. त्यामुळे १ डिसेंबरपासून पहिली ते सातवीच्या शाळा सुरू करण्याबाबत मुंबईतला निर्णय मुंबई महानगरपालिकेने पुढे ढकलला आहे.
यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ म्हणतात की, विविध पालिकांनी शाळा सुरू करण्याबाबत वेगवेगळे निर्णय घ्यायला सुरुवात केल्यामुळे संभ्रम आहे. तेव्हा आम्हीही अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेऊ.
हे ही वाचा:
‘उद्धव ठाकरेंनी सत्तेपोटी भगवा सोडला आणि हिरवा हातात घेतला’
पीटरसनने का मानले पंतप्रधान मोदींचे आभार?
ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर; काँग्रेसला दूर ठेवणार
नाशिकमध्येही १० डिसेंबरनंतरच शाळा सुरू करण्याचा विचार करण्यात आला आहे. त्याआधी १ डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते १२ वीपर्यंतचे वर्ग विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहेत. बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळा-ज्युनियर महाविद्यालये उघडण्याविषयी निर्णय घेण्यात आला होता. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी हा निर्णय जाहीर केला. त्या म्हणाल्या की, प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय.