मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग हे सोमवारी चांदीवाल आयोगाच्या कार्यालयात आले. सोमवारी ते चांदीवाल आयोगासमोर उभे राहतील. त्यांच्या वकीलांशी ते चर्चा करत आहेत.
मुख्य म्हणजे चांदीवाल आयोगासमोर हजर होताच परमबीर सिंग यांच्याशी सचिन वाझे बोलत आहेत. तब्बल ८ महिन्यांनंतर परमबीर सिंग आणि सचिन वाझे समोरासमोर आल्याचे दिसले. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून (एनआयए) सचिन वाझेला अटक झाल्यांनंतर परमबीर सिंग आणि सचिन वाझे पहिल्यांदाच समोरासमोर आले आहेत. त्यामुळे त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली, कोणत्या विषयावर ते बोलले याबद्दल उत्सुकता आहे.
सचिन वाझेने काही मिनिटे परमबीर यांच्याशी चर्चा केली. दरम्यान, परमबीर सिग यांचं जामीनपत्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. पण त्यांना १५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. तो दंड मुख्यमंत्री कल्याणनिधीत त्यांनी एका आठवड्यात जमा करायचा आहे. परमबीर सिंग यांच्या वतीने त्यांचे वकील आज प्रतिज्ञापत्र सादर करणार आहेत.
गेल्या आठवड्यात परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले होते. पण ते परदेशात नव्हते तर देशातच होते हे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांनी न्यायालयासमोर हजर राहण्याचे ठरविले.
हे ही वाचा:
केबीसीच्या २१ वर्षांच्या प्रवासाच्या आठवणींनी बिग बी भावूक
फटाक्यांच्या आतिषबाजीत २० ते २५ दुचाकी जळून खाक
भाईंदरमध्ये फेरीवाल्याकडून पालिका अधिकाऱ्यावर रॉडने हल्ला
‘सदन की कार्यवाही शुरु…’ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपप्रकरणाची चौकशी सध्या चांदीवाल आयोगाच्या अंतर्गत होत आहे. त्यासाठी परमबीर यांना हजर राहायचे होते. सोमवारी या आयोगासमोर हजर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.