माओवाद्यांनी शुक्रवारी रात्री छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यातील करमारी गावातील सरपंचाच्या पतीची क्रूरपणे हत्या केली. तो विकास प्रकल्पांना, कल्याणकारी योजनांना प्रशासनाला पाठिंबा देत होता म्हणून त्याची हत्या करण्यात आली.
माओवाद्यांनी ३३ वर्षीय बिरजू सलाम यांची, त्यांच्या सरपंच पत्नी, कुटुंबातील इतर सदस्य आणि गावकऱ्यांसमोर त्यांचा गळा चिरून हत्या केली. करमारी हे गाव जिल्हा मुख्यालयापासून २० किमी अंतरावर आहे. या घटनेने घाबरलेल्या ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार केली.
माओवादी हे पर्यवेक्षकांना आणि कंत्राटदारांना ठार करून प्रकल्पांची गती कमी करतात तसेच स्थानिक लोकांना त्रास देतात. याच गोष्टीला बिरजू हे तीव्र विरोध करत होते. शुक्रवारी रात्री ११.३० च्या सुमारास या माओवाद्यांनी सरपंचाच्या घरात घुसून बिरजूला बाहेर काढले. छत्तीसगडच्या बस्तरमध्ये अनेक विकासात्मक उपक्रम चालू होते. त्यात अडथळे आणण्यासाठी माओवाद्यांनी अनेक हत्या केल्या आहेत.
हे ही वाचा:
‘ठाकरे सरकारने दोन वर्षात १०० कोटी, हजारो कोटींचे टेंडर कमावले’
त्रिपुरामध्ये पुन्हा भाजपाचाच बोलबाला!
मेघालयातील गावकऱ्यांनी बनवली पंतप्रधान मोदींच्या नावाने खास ट्यून!
‘आजचा दिवस बेईमान दिवस म्हणून साजरा करायला हवा’
काही वर्षांपूर्वी माओवाद्यांनी दोन अधिकाऱ्यांची हत्या केली होती. त्याच अधिकारांच्या हत्येचा बदला कमांडोंनी माओवाद्यांच्या प्रमुखांना कंठस्नान घालून घेतला होता. सुमारे एक वर्षांपूर्वी नितीन भालेराव आणि विकासकुमार यांची माओवाद्यांनी हत्या केली होती. या हल्ल्याचे नेतृत्व ज्याने केले त्या माओवादी कमांडरला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. सुकुमा येथे शुक्रवारी संध्याकाळी या कमांडरला मारण्यात आले. त्याचे नाव माडवी भीमा उर्फ बस्ता असे होते. तो किमान ११ मोठया हल्ल्यांचा सूत्रधार होता.