२६ नोव्हेंबर २००८… मुंबईला हादरवणारा दिवस. आजही मागे वळून पाहिलं तर अंगावर काटा येतो. आज या हल्ल्याला तेरा वर्ष पूर्ण झाली. तरीदेखील या हल्ल्याच्या आठवणी मात्र प्रत्येक मुंबईकराच्या मनात ताज्याच आहेत.समुद्रमार्गाने आलेल्या पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. २६/११ मुंबई हल्ल्याच्या थरारक, वेदनादायी, कटू आठवणी आजही प्रत्येक मुंबईकर आणि भारतीयांच्या मनात कायम आहेत.
मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या १३ वर्षानंतर आज भारतीय व्यवस्थापन संस्था अहमदाबाद (IIMA) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NID) च्या विद्यार्थ्यांनी १५० पेक्षा अधिक लोकांना वाचवलेल्या कामा रुग्णालयातील ११ परिचारिकांचा गौरव करणारा लघूपट ‘मोअर दॅन युनिफॉर्म: नर्सेस अट द फ्रंटलाइन’ गुरुवारी आयआयएमए येथे या लघूपटचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला.
हे ही वाचा:
मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या
फडणवीसांची दिल्लीवारी ही संघटनात्मक बैठकीसाठीच
२६/११ हल्ल्यावेळी कामा रुग्णालयातील परिचारिका माधुरी राहाटे रुग्णालयात रात्रपाळीला होत्या. पाकिस्तानी दहशवादी अजमल कसाबने लक्ष्य केलेल्या रुग्णालयात अडकलेल्या कर्मचाऱ्यांपैकी त्या एक होत्या. त्यांनी त्यांच्या वेदनादायी आठवणींना उजाळा दिला, ” आम्हाला आधी असे वाटले की काहीतरी उत्सव सुरु आहे आणि त्यामुळे लोकांची तारांबळ उडाली आहे पण हे काहीतरी वेगळच आहे हे त्यांच्या लक्षात आलं गोळीबारानंतर दोन गार्ड्स कोसळताना त्यांनी पहिले. रुग्णालयात रक्तस्त्राव होत होता, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमच्याकडे कोणतेही प्रशिक्षण नव्हते पण माझ्या मनात फक्त एकच गोष्ट होती काहीही झाले तरी आम्हाला आमच्या रुग्णांना वाचवायचे आहे. आमच्या विभातील कर्मचाऱ्यांना धीर देऊन डगमगून न जाता त्यांना लोकांना धीर द्यायला सांगितल. राहाटे सोबत अजून दोन परिचारिका होत्या योगिता बागड आणि लक्ष्मी या दोघी लघूपट प्रदर्शित करताना उपस्तित होत्या.
“रुग्णालयातील आपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणाऱ्या प्रकल्पावर काम करत असताना, कामा हॉस्पिटलमध्ये मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख होता. तोपर्यंत मला याबद्दल माहिती नव्हती… आणि माझ्यासारख्या अनेकांना त्यांच्या कथेबद्दल माहिती नाही. ताज हॉटेलवरील हल्ल्या सर्वांच्या लक्षात आहे परंतु या परिचारिकांना समान मान्यता देण्यात आली नाही… १३ वर्षांनंतर, आम्ही कामा हॉस्पिटलच्या परिचारिकांचा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला,” चांदवानी म्हणाले, जे सेंटर फॉर मॅनेजमेंट ऑफ हेल्थचे अध्यक्ष आहेत. आज हा लघूपट युट्युब वर प्रदर्शित होणार आहे.