गुरुवारी (२५नोव्हेंबर) भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. त्यानंतर आज (२६ नोव्हेंबर) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही दिल्ली दौरा केला. त्यानंतर राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले होते. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या दौऱ्याबद्दल माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील आणि मी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) संघटनात्मक बैठकीसाठी दिल्लीत आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. संघटनेच्या कामाचा आढावा आणि संघटनेची पुढील वाटचाल कशी असेल यासंबंधी बैठक झाल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आमचे नेते दिल्लीत आहे त्यामुळे दिल्लीला आल्यावर वेळ असल्यास नक्की भेट घेतो कोणताही संघटनात्मक बदल होणार नसल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा:
मुंबई महापालिकेत बसणार भाजपाचाच महापौर
चाळीसगावचे वर्दीतले चोर! बघा आमदारांनी केलेले Sting Operation
भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या
शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप
नारायण राणे यांनी भविष्यवाणी केली आहे की महाराष्ट्रात भाजपचे सरकार येणार यावर फडणवीस यांना विचारले असता त्यांना नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याची कल्पना नसल्याचे त्यांनी म्हटले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही ठिकाणी बिनविरोध होणार आहेत. मात्र, नागपूरमध्ये काँग्रेसने अर्ज मागे घेतलेला नाही. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, काँग्रेसला अशी अपेक्षा आहे की नागपूरमध्ये काहीतरी चमत्कार घडेल पण, असे काहीही होणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
संघटनात्मक बैठकीसाठी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह आम्ही दिल्लीत!
नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis यांची माहिती..@ChDadaPatil pic.twitter.com/DPtlhnqrC9— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) November 26, 2021
सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून विधानपरिषद निवडणुका बिनविरोध होणार का याकडे लक्ष लागून असणार आहे. दोन दिवसांपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यावरूनही राजकीय वर्तुळात भाजप- मनसे युतीच्या चर्चांना उधाण आले होते.