भाजपचे पदाधिकारी अमोल इघे यांच्या हत्येने नाशिक हादरले. याच पार्श्वभूमीवर भाजपने सातपूर पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. पोलीस ठाण्याबाहेर भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. भाजप आमदार राहुल टिकले, सीमा हिरे हे सातपूर पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित आहेत. पोलीस ठाण्यात कोणत्याही अधिकाऱ्याला प्रवेश दिला जात नाही.
नाशिकमध्ये हल्ल्यांचे सत्र सुरू असून ही चार दिवसांमधील तिसरी हत्या आहे. अमोल इघे हे सातपूर भाजप मंडळ अध्यक्ष होते. सातपूरच्या कार्बन नाका परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. भजाप पदाधिकाऱ्याची हत्या झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पदाधिकाऱ्याच्या हत्येने भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
हे ही वाचा:
गुजरात दंगल प्रकरणांत सेटलवाड यांनी जाफरींना उसकावले
पहिल्या दिवसापासून परमबीर आणि शिवसेनेचे साटेलोटे!
शक्ती मिल बलात्कार प्रकरणातील दोषींना आता फाशीऐवजी जन्मठेप
भाजप पदाधिकारी अमोल इघे यांची हत्या
ही हत्या राजकीय पूर्ववैमनस्यातून झाली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अवघ्या चार दिवसात नाशिक मधील तिसरी हत्या असून यामुळे परिसरात खळबळ माजली आहे. तसेच शहरातील पोलिसांच्या गस्ती बाबत आणि कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक येथील म्हसरूळ आरटीओ ऑफिसजवळ एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. तर, आरपीआयची महिला पदाधिकारी पूजा आंबेकर यांची चाकूने वार करुन हत्या केल्याची घटना समोर आली होती.