उत्तर प्रदेशमधील काँग्रेस पक्षाचा गड मानला जाणाऱ्या रायबरेलीला सुरुंग लागला आहे. देशात आणि उत्तर प्रदेशात सत्ता असणाऱ्या भारतीय जनता पार्टीने रायबरेलीत घुसून काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच नाही तर थेट आमदारालाच गळला लावले आहे. काँग्रेस आमदार आदिती सिंह यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
रायबरेली येथील काँग्रेस पक्षाचे आमदार आदिती सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. बुधवार २४ नोव्हेंबर रोजी आदिती सिंह यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह कमळ हाती घेतले आहे. त्यामुळे अवघ्या काही महिन्यात येऊ घातलेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीचे वारे भाजपच्या बाजूने वाहत असल्याचे म्हटले जात आहे. तर रायबरेलीच्या आमदारांचा भाजपा प्रवेश हा थेट काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना धक्का मानला जात आहे. सोनिया गांधी या रायबरेली लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आहेत.
हे ही वाचा:
वानखेडेंविरोधात ट्विट करणार नाही! नवाब मलिक मुंबई उच्च न्यायालयासमोर नमले
स्वीडनला मिळाल्या पहिल्या महिला पंतप्रधान! पण काही तासांतच दिला राजीनामा
“लोककल्याणकारी धोरणांसाठी कटिबद्ध असलेल्या, देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला सर्वोच्च स्थान देणारा लोकशाहीवादी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आणि आशा आहे की राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सक्षम नेतृत्वाखाली मी माझ्या जनतेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करू शकेन. मी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वाचे आभार मानते” असे अदिती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री @myogiadityanath जी के सानिध्य एवं कुशल नेतृत्व में मैं अपने क्षेत्रवासियों के सम्पूर्ण विकास के लक्ष्य को प्राप्त कर सकूँगी।
मैं भाजपा के शीर्ष नेतृत्व को आभार एवं धन्यवाद प्रेषित करती हूँ।। (2/2)
जय हिंद! pic.twitter.com/GGWXZlC4sg— Aditi Singh (@AditiSinghRBL) November 24, 2021
अदिती सिंह या भाजपवासी होणार याची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासूनच रंगली होती. अदिती यांनी अयोध्या येथील रामजन्मभूमीवर होऊ घातलेल्या राम मंदिराला देणगी दिली होती. त्यामुळे या चर्चा अधिकच वाढल्या होत्या.