27 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषपरमबीर यांनी केली कसाबला मदत?

परमबीर यांनी केली कसाबला मदत?

Google News Follow

Related

सध्या फरार असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह तपास यंत्रणांच्या रडारवर असतानाच सिंह यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिस दलातील निवृत्त एस पी समशेर खान पठाण यांनी परमबीर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मुंबई येथे झालेल्या भीषण अशा २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवाद्यांना परमबीर यांनी मदत केल्याचा आरोप पठाण यांनी केला आहे. या हल्ल्याचा मास्टर माईंड असलेला कसाब याचा मोबाईल फोन गायब करायला परमबीर सिंहा यांनी मदत केली असा दावा पठाण यांचा आहे. पठाण यांच्या आरोपांमुळे एकच खळबळ माजली असून परमबीर यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या आरोपांच्या संदर्भात समशेर खान पठाण यांनी सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या पोलिस आयुक्तांना एक पत्र लिहिले आहे. २६ सप्टेंबर २०२१ रोजी लिहिलेल्या पत्रात पठाण असे म्हणतात की २६/११ हल्ल्यात जिवंत पकडलेला अतिरेकी कसाब याला ज्या ठिकाणी पकडण्यात आले तिथे अचानकपणे परमबीर सिंह दाखल झाले. तेव्हा कसाबचा फोन परमबीर सिंह यांनी घेतला आणि आपल्या ताब्यात ठेवला. नियमानुसार तो फोन रमेश महाले या तपास अधिकाऱ्यांना देणे अपेक्षित होते. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी समशेर खान पठाण यांनी केली आहे.

हे ही वाचा:

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेला मुदतवाढ

परमबीर सिंग चंदीगडमध्ये असल्याची माहिती

आनंदाची बातमी; दर घसरले!

विलिनीकरण की पगारवाढ; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर कोणता तोडगा?

पठाण यांच्या पत्रामुळे आता परमबीर यांची चौकशी होणार का याविषयी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान बुधवार, २४ नोव्हेंबर रोजी परमबीर हे चंदीगड मध्ये असल्याची माहिती पुढे आली आहे. अटकेपासून दिलासा मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचे म्हटले होते. पण ‘एबीपी माझा’ ला त्यांनी सांगितले की, ते चंदीगडमध्ये आहेत. लवकरच ते पुढील चौकशीसाठी मुंबईत येऊ शकतील. त्यांना अनेक समन्स पाठविल्यानंतरही ते हजर राहण्यास तयार नव्हते. ते बेल्जियमला गेल्याचेही सांगण्यात येत होते. अखेर ते भारतातच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा