झी मराठीवरील सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ‘चला हवा येऊ द्या’ हा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. काही दिवसांपूर्वी या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पात्र दाखवण्यात आले होते. मात्र, त्यावरून राज्यभरात राणे समर्थकांनी संताप व्यक्त केला. याच पार्श्वभूमीवर कार्यक्रमाचे सूत्र संचालक निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने नारायण राणे यांची भेट घेत दिलगिरी व्यक्त केली.
‘चला हवा येऊ द्या’ चे सूत्रसंचालक निलेश साबळे आणि टीमने काल (२३ नोव्हेंबर) केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची भेट घेऊन झाल्याप्रकारासाठी दिलगिरी व्यक्त केली. झी मराठी वरील या कार्यक्रमात झालेल्या ‘दिवाळी अधिवेशन’ या कार्यक्रमात नारायण राणे यांचे पात्र दाखविण्यात आले होते. कार्यक्रमानंतर राणे समर्थकांनी या पात्रावर आक्षेप नोंदविला होता. तसेच राणे समर्थक आणि कार्यकर्त्यांनी झी मराठी आणि साबळे यांना संपर्क करून संताप व्यक्त केला होता.
हे ही वाचा:
उपराष्ट्रपतींचे निवासस्थान कुठे असावे हे पण सामान्य माणसाला विचारायचे की काय?
मुंबई विमानतळावर जप्त केले २० कोटींचे ड्रग्ज
एमआयएमने पुन्हा दिली मुस्लिम आरक्षणाची बांग! ११ डिसेंबरला मोर्चा!
‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’
यानंतर काल निलेश साबळे आणि त्यांच्या टीमने नारायण राणे यांची त्यांच्या अधिश या निवासस्थानी भेट घेतली. नारायण राणे हे ‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमाचे रसिक प्रेक्षक आहेत. त्यांनी कलाकारांचा नेहमीच सन्मान केला आहे. एखादी व्यक्तिरेखा साकारताना कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नव्हता. मात्र, परत अशी चूक होणार नाही, असे निलेश साबळे यांनी भेटी दरम्यान सांगितले. यावेळी भाजप आमदार नितेश राणेदेखील उपस्थित होते.