मुंबई पोलिसांचे माजी पोलीस आयुक्त परमबीर यांच्या घरावर न्यायालयाने नोटीस चिकटविली असून आता त्यांच्याविरोधात न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांना फरार घोषित करण्यात आले असून न्यायालयाचा तसा आदेश परमबीर सिंग यांच्या मुंबईतील जुहू येथील घराबाहेर लावण्यात आला आहे. परमबीर सिंग यांना ३० दिवसांच्या आत न्यायालयात हजर राहण्याचे आदेश अल्टिमेटम देण्यात आले आहे. ते वेळेवर हजर न झाल्यास मालमत्ता जप्त करण्यात येईल असा इशाराही दिला आहे.
Mumbai: A court order, declaring former Mumbai Police Commissioner Param Bir Singh as 'absconding', pasted outside his flat located in Juhu. pic.twitter.com/zueYJu8f99
— ANI (@ANI) November 23, 2021
परमबीर यांच्या वकिलाने ते भारतातच असल्याचे न्यायालयाला सांगितले होते. त्यानंतर परमबीर सिंग यांना त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांप्रकरणी होणाऱ्या अटकेपासून सोमवारी न्यायालयाने संरक्षण दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी त्यांना अटक करण्यास मनाई करणारा आदेश दिला असून या काळात परमबीर यांनी चौकशीस सामोरे जावे. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक करू नये, असे खंडपीठाने म्हटले आहे.
हे ही वाचा:
उत्तर प्रदेशात उभी राहणार १० हजार कोटींची चित्रसृष्टी
‘पाकिस्तानवर कारवाई न करणे ही मनमोहन सिंग सरकारची कमजोरी’
घरगुती कामगारांचा एका वर्षात तयार होणार अहवाल
जेव्हा शरद पवारांच्या सरकारने केलेला गोवारी समाजावर लाठीचार्ज!
रियाज भाटी आणि विनय सिंग यांनाही फरार घोषित करण्यात आले आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधात मुंबई आणि ठाण्यात वसुलीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. वारंवार समन्स बजावूनही परमबीर हजर होत नसल्यामुळे त्यांना घोषित करण्यात आले. दरम्यान काल त्यांना अटकेपासून संरक्षण देऊन तपासात सहकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.