24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणदेशातील घटनेवर बोलणारे, राज्यातील घटनेबाबत गप्प का?

देशातील घटनेवर बोलणारे, राज्यातील घटनेबाबत गप्प का?

Google News Follow

Related

विरोधी पक्षनेते फडणवीसांनी विचारला प्रश्न

देशभरात कोणतीही घटना घडली की, राज्यातील महाविकास आघाडीचे नेते त्यावर प्रतिक्रिया देतात, पण राज्यातील घटनेबाबत काहीही करत नाहीत, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत राज्य सरकारच्या आडमुठ्या भूमिकेवर टीका केली.

पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, सरकारची भूमिका आडमुठेपणाची आणि जीवघेणी आहे. उलट तात्काळ पुढाकार घेऊन एसटी कर्मचाऱ्यांबाबत सरकारने भूमिका घेतली पाहिजे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी मध्यंतरी भेट घेतली तेव्हा आपण एसटी संदर्भात त्यांना काही सूचना केल्या. आवश्यकता असेल तर मी त्यांच्यासोबत आणखी चर्चा करायला तयार आहे. विलिनीकरणाबाबत मी सूचना केली आहे. ते कसे करता येईल हे मी बोललो आहे. आता सरकारला निर्णय घ्यायचा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सकाळी जनतेला संबोधित करताना तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतल्यावर विरोधकांना हुरूप आला. त्यावर विचारलेल्या प्रश्नांना फडणवीस यांनी रोखठोक उत्तरे दिली.

ते म्हणाले, टीका करणारे टीका करतात. पंतप्रधानांनी निर्णय शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतला होता. काही लोक सातत्याने विरोध करत राहिले पंतप्रधानांनी स्पष्ट सांगितले की, काही लोकांना हे कृषी कायदे पटवून देऊ शकलो नाही म्हणून मागे घेतले कायदे. लोकशाहीमध्ये अशा प्रकारचा निर्णय फार कमी लोक घेतात. मोदी यांनी ते धाडस दाखविले. मात्र जे टीका करत आहेत त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीही केलेले नाही. एकट्या महाराष्ट्रात ९ हजार कोटी रुपयांची मदत पंतप्रधान मोदींनी किसान सन्मान योजनेतून दिली आहे. यूपीएच्या काळात ३५ हजार कोटींचे बजेट होते ते मोदी सरकारच्या काळात १ लाख ३५ हजार कोटींचे झाले आहे.

हे ही वाचा:

आनंद महिंद्रना बुटांच्या स्टार्टअपचा ‘आशय’ भावला!

घरातला गॅस संपला आणि एसटी कर्मचाऱ्याने जीवनही संपविले

राज्यातील तळीरामांना ठाकरे सरकारचे गिफ्ट! स्कॉचवरील एक्साईज ड्युटीमध्ये कपात

३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल

 

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये शेतकरी कायदे मागे घेतल्यासंदर्भात अग्रलेख लिहिण्यात आला आहे. त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, अहंकाराचा पराभव झाल्याचे राऊत म्हणतात, ते स्वतःच अहंकारी आहेत. संजय राऊत यांच्या लेखातून तोच अहंकार झळकतो आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा