प्लास्टिक कचऱ्यापासून बूट बनविणाऱ्या एका तरुणाने लक्ष वेधले आहे ते थेट महिंद्र कंपनीचे प्रमुख आनंद महिंद्रचे. सोशल मीडियावरील घडामोडींवर नजर ठेवणाऱ्या आनंद महिंद्र यांना आशय भावे नावाच्या २३ वर्षीय युवकाच्या गुणवत्तेने अचंबित केले. त्याच्या स्टार्टअपसाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. आशय भावे प्लास्टिकच्या कचऱ्यापासून बूट तयार करत असून त्याच्या स्टार्टअपचे महिंद्र यांनी कौतुक केले आहे.
आशय भावेच्या या स्टार्टअपविषयी महिंद्र यांना ट्विटरद्वारे माहिती मिळाल्यावर त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून आशयच्या स्टार्टअपचे कौतुक केले. पण अशा स्टार्टअपची आपल्याला माहिती नाही, याची खंतही त्यांनी बोलून दाखविली. पण ती भावना व्यक्त करतानाच त्याला मदतनिधी देण्याचीही तयारी त्यांनी दाखविली.
स्वतः आनंद महिंद्र हे आशयकडून बूट खरेदी करणार आहेत. हे बूट कसे खरेदी करता येतील, अशी विचारणा त्यांनी केली आहे. स्टार्टअपसाठी निधी गोळा करताना आम्हाला त्यात सामावून घ्या, असे आवाहनही महिंद्र यांनी केले.
This is awesome!
A startup in India 🇮🇳 is making these sneakers (a $70 billion market) are made of garbage (12 plastic bottles and handful of trash bags). And for $110, they will be shipped anywhere in the world.@Thaely_inc— Erik Solheim (@ErikSolheim) November 17, 2021
नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन महिंद्र यांना गौरविण्यात आले होते. तेव्हा आपण या पुरस्कारासाठी पात्र नाही तर या पुरस्काराने ज्या तळागाळातील लोकांना गौरविण्यात आले ते अधिक या पुरस्कारासाठी लायक आहेत, असे ते म्हणाले होते.
हे ही वाचा:
३९ हजार झाडांची कत्तल करण्याची कशी दिली परवानगी? आदित्य ठाकरेंना सवाल
…आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात
‘एसटी महिला कर्मचारी अनिल परबांची साडी चोळी नारळाने ओटी भरतील’
कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता
आशय भावेने जुलै २०२१मध्ये थैली हे स्टार्टअप सुरू केल्यानंतर त्यात प्लास्टिकपासून बूट बनविण्यास सुरुवात केली. बूट बनविण्यासाठी १२ प्लास्टिक बाटल्या आणि १० प्लास्टिक पिशव्यांची आवश्यकता असते असे आशयचे म्हणणे आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या वापराच्या समस्येवर उपाय काढणे हे आशयच्या कंपनीचा उद्देश आहे.