25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेष...आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात

…आणि महिला वनरक्षकाला वाघाने ओढत नेले जंगलात

Google News Follow

Related

ताडोबा जंगलात महिला वनरक्षकच वाघाची शिकार ठरल्याची धक्कादायक घटना घडली आहे. स्वाती ढुमणे (वय ४३) असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वनरक्षकाचे नाव आहे. व्याघ्रगणनेची पूर्वतयारी करण्यासाठी कोअर क्षेत्रात गेलेल्या महिला वनरक्षकावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला. जंगलातील कोअर झोनमध्ये आज सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिला वनरक्षक स्वाती ढुमणे या चार वनमजुरांसोबत आज सकाळी कोलारा कोअर झोनच्या कक्ष क्र. ९७ मध्ये गेल्या होत्या. तिथे असलेल्या वॉटर होलजवळ पाणी आहे की, नाही याची पाहणी त्या करत असताना पाणवठ्याजवळ दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. स्वाती यांना वाघाने पकडून ओढत जंगलात नेले. सोबत असलेल्या वनमजुरांनी वाघाला हुसकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत स्वाती यांना वाघाने ठार केले होते.

हे ही वाचा:

मालिकेवर भारताचा शिक्का! हर्षल पटेल चमकला

कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता

तुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार

डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?

संबंधित घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शोधमोहीम सुरू केल्यावर स्वाती यांचा मृतदेह जंगलात सापडला. सध्या व्याघ्रगणनेसाठी देशातील सर्वच जंगलात वनविभागाच्या वतीने पूर्वतयारी केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वाती या कोअर झोनमध्ये गेल्या होत्या.

स्वाती या महिला वनरक्षक मागील वर्षी विरुर वनपरिक्षेत्रातून बदली होऊन ताडोबात आल्या होत्या. त्यांना दोन लहान अपत्य आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा