भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाने आपला मालिका विजय निश्चित केला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकत भारतीय संघाने मालिका खिशात घातली आहे. शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी रांची येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा सात गडी राखत दणदणीत पराभव केला. त्यामुळे भारताने या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
हे ही वाचा:
तुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार
डिव्हीलयर्सने निवृत्ती घेताना भारताला का दिले धन्यवाद?
कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर आरोप लावल्यानंतर चीनची टेनिसपटू बेपत्ता
भाजपाने जाहीर केले विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार
पहिल्या सामन्याप्रमाणे या सामन्यातही भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंड संघाकडून सलामीवीर मार्टिन गप्टिल आणि डॅरेल मिशेल यांनी धडाकेबाज सुरुवात केली. त्यांनी ४८ धावांची भागीदारी रचली. त्या दोघांनीही वैयक्तिक ३१ धावा केल्या. तर त्यानंतर फिलिप्स याने तुफान फटकेबाजी करत २१ चेंडूंमध्ये ३४ धावा कुटल्या. या कामगिरीच्या जोरावर त्यांनी २० षटकांमध्ये धावफलकावर १५३ धावा चढवल्या. त्याबदल्यात न्यूझीलंड संघाचे सहा गडी बाद झाले. भारताकडून पदार्पण करणारा जलदगती गोलंदाज हर्षल पाटेल याने आपल्या कामगिरीने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने ४ षटकांत २५ धावा देताना दोन गडी बाद केले.
१५४ धावांचे विजय लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून भारताचे दोन्ही सलामीवीर मैदानात उतरलेले कर्णधार रोहित शर्मा आणि उपकर्णधार के.एल. राहुल या दोघांनीही आपली वैयक्तिक अर्धशतके साजरी करताना शतकी भागीदारी रचली आणि भारतीय संघाला मजबूत पाया उभा करून दिला. के.एल राहुल याने ४९ चेंडूत ६५ धावा केल्या. तर रोहित शर्माने ३६ चेंडूत ५५ धावा कुटल्या. या कामगिरीच्या जोरावर भारताने अठराव्या षटकातच हा सामना संपवला. हर्षल पटेलला त्याच्या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.