25 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरराजकारणतुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार

तुपकर यांच्या आईने ठणकावले; माझ्या मुलाला काही झाले तर सरकार जबाबदार

Google News Follow

Related

विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी बुधवारपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू असून गेल्या दोन दिवसांपासून तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. सोयाबीनला ८ हजार तर कापसाला १२ हजार रुपये भाव मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. तसेच ही मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

आंदोलनादरम्यान रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांना नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र त्यांनी उपचार घेण्यास नकार देऊन अन्नत्याग आंदोलन सुरू ठेवले आहे. दरम्यान माझ्या मुलाला काही झाल्यास त्याला सरकार जबाबदार असेल, असा इशारा तुपकर यांच्या आईने दिला आहे.

हे ही वाचा:

अमरावतीमध्ये इंटरनेट सेवा पूर्ववत, पण संचारबंदी कायम

भाजपाने जाहीर केले विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार

भारतीय नौदलाला मिळणार नवी ‘शक्ती’

…म्हणून विक्रम गोखले माध्यमांवर भडकले

अदयापही राज्य सरकारकडून त्यांच्या या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. जीव गेला तरी चालेल पण शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका तुपकर यांनी घेतली आहे. दरम्यान, तुपकर यांच्या आईने आंदोलनस्थळी येऊन, आपल्या मुलाची भेट घेतली. तुपकर यांची अवस्था पाहून आईला आश्रू अनावर झाले. माझ्या मुलाच्या आंदोलनाची तातडीने सरकारने दखल घ्यावी, अन्यथा माझ्या मुलाचे काही बरे वाईट झाल्यास त्याची जबाबदारी ही सरकारची असेल असा इशारा तुपकर यांच्या आई गीताबाई तुपकर यांनी दिला आहे.

शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी बुलडाणा तहसीलदाराची गाडी पेटवून दिल्याने या आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी महामार्गावर कार्यकर्त्यांनी रस्ता रोकोही केला. एकीकडे राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून त्यावर अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा