आज म्हणजेच शुक्रवार, १९ नोव्हेंबर रोजी या वर्षीचे सर्वात मोठे चंद्रग्रहण लागणार आहे. हे या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. तसेच या शतकातील सर्वात मोठे चंद्रग्रहण असेल असे सांगितले जात आहे. या ग्रहणाचा कालावधी जवळपास सहा तासांचा आहे. हे एक प्रकारचे अंशिक स्वरूपाचे चंद्रग्रहण असून ५८० वर्षांनंतर अशाप्रकारचे चंद्रग्रहण हे अनुभवायला मिळणार आहे. हे खंडग्रास चंद्रग्रहण असेल. पश्चिम आशिया, वायव्य अफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या भागातून हे चंद्रग्रहण बघता येणार आहे.
काय असेल ग्रहणाचा कालावधी?
ग्रहण सकाळी साडे अकराच्या सुमारास सुरू होईल. ११ वाजून ३४ मिनीटांची ग्रहण सुरू होण्याची वेळ देण्यात आली आहे. तर पुढे तब्बल ५ तास आणि ५९ मिनिट हे ग्रहण चालेल. संध्याकाळी ५ वाजून ३३ मिनिटांनी या ग्रहणाची समाप्ती होईल. हे ग्रहण नग्न डोळ्यांनी बघता येणार नाही. हे ग्रहण पाहायचे असल्यास विशिष्ट प्रकारच्या उपकरणांचा वापर करावा लागणार आहे.
हे ही वाचा:
भारताने दिल्या १०० देशांना लशी!
भारतीय फुटबॉलचा आवाज हरपला; नोवी कपाडिया यांचे निधन
‘पवारांच्या धमक्यांना भीक घालत नाही’
तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
ज्योतिष शास्त्राच्या अनुषंगानेही या ग्रहणाचे राशींवर परिणाम होणार आहेत. काही राशींसाठी हे ग्रहण शुभ ठरणार आहे. तर काही राशींवर याचे विपरीत परिणाम होतील. हे चंद्र ग्रहण तूळ, कुंभ आणि मीन या तीन राशींसाठी लाभदायी ठरणार आहे. तर मेष, वृषभ, सिंह आणि वृश्चिक या चार राशींवर ग्रहणाचे विपरीत परिणाम होणार आहेत.