कोल्हापुरात पोलिसांची मोठी कारवाई
मुंबईतील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर मुंबई पोलिसांचे अमलीपदार्थ विरोधी पथक आणि एनसीबीच्या कारवायांना अधिक जोर आला असून मुंबई पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कारवाई करत कोल्हापूर येथील अमलीपदार्थ तयार करणारा कारखाना उध्वस्त केला आहे. कारवाईत कोट्यवधी रुपयांचे अमलीपदार्थ आणि अमलीपदार्थ तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल जप्त करण्यात आला आहे. कारवाई दरम्यान कारखान्याच्या केअर टेकरला अटक करण्यात आली आहे.
मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकाच्या वांद्रे युनिटने १३ नोव्हेंबर रोजी साकीनाका येथून एका महिलेला अमलीपदार्थासह अटक केली होती. या महिलेकडून चौकशीदरम्यान तिने अमली पदार्थ एका व्यक्तीकडून घेतला असून त्याचा कोल्हापूरला जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात असणाऱ्या ढोलगरवाडी या ठिकाणी अमलीपदार्थ तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती समोर आली होती.
हे ही वाचा:
गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र
कोकणात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कलगीतुरा!
पवई येथील ह्युन्डाई कार सर्व्हिस सेंटर आगीच्या तडाख्यात
गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका; फडणवीसांचे पत्र
या महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारे वांद्रे आणि घाटकोपर युनिटने कोल्हापूरातील ढोलगरवाडी येथील एका कारखान्यावर छापा टाकला असता या कारखान्यात पोल्ट्रीफार्म आणि शेळ्या पालनच्या नावाखाली अमलीपदार्थ बनवण्याचा उद्योग सुरू असल्याचे समोर आले. अमलीपदार्थ विरोधी पथकाने हा कारखाना उद्ध्वस्त करून एकाला अटक केली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात एमडी आणि त्यासाठी लागणार कच्चा माल आणि एमडी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण २ कोटी ३५ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.
अमलीपदार्थ विरोधी पथकाने छाप टाकून उद्ध्वस्त केलेला ड्रग्स कारखाना ज्या फार्म हाऊसवर होता, तो फार्म हाउस मुंबईतील वकील राजकुमार राजहंस यांच्या नावावर आहे. अमलीपदार्थ विरोधी पथक त्यांचा या प्रकरणात शोध घेत आहेत.